दुबई एअर शोमध्ये भारताचे लढाऊ विमान ‘तेजस’ कोसळले

अबुधाबी :
दुबई एअर शोमध्ये भारताचे स्वदेशी लढाऊ विमान तेजस उड्डाणादरम्यान क्रॅश झाल्याची धक्कादायक घटना घडली. 42 वर्षांच्या मेहनतीच्या या प्रवासाला एका क्षणात हादरा बसल्याची चर्चा आहे. तेजसच्या कामगिरीमुळे अनेक देश त्याची खरेदी करण्यासाठी तयार होते. मात्र, या अपघाताचा भविष्यातील डिफेन्स डीलवर परिणाम होऊ शकतो.
दुबईमध्ये काल हवाई कसरती सुरू असतानाच तेजसने उड्डाण केल्यानंतर ते कोसळले. विमान अचानक स्थिर झाले. यानंतर विमानाचे नाक थेट जमिनीच्या दिशेने वळले आणि काही सेकंदात विमान जमिनीवर कोसळले. वैमानिकाने इजेक्ट केले नव्हते. यामुळे दुर्घटनेत वैमानिक जखमी झाला असावा, अथवा त्याचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
विमान जमिनीवर कोसळताच आग लागली आणि धुराचे लोट आकाशाच्या दिशेने जात असल्याचे दिसू लागले. विमान कोसळल्याचे कारण जाणून घेण्यासाठी चौकशी सुरू आहे.

कोर्ट ऑफ इन्क्वायरी स्थापन

या अपघातानंतर, भारतीय हवाई दलाने लढाऊ विमान अपघाताचे कारण शोधण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरी स्थापन केली आहे. हवाई दलाच्या तेजस जेटशी संबंधित ही दुसरी घटना आहे. यापूर्वी, 2024 मध्ये राजस्थानमधील पोखरण येथे एका युद्धादरम्यान इंजिन बिघाडामुळे तेजस जेट कोसळले होते. 1983 मध्ये भारत सरकारने जुन्या मिग-21 ला बदलण्यासाठी एलसी प्रकल्पाची घोषणा केली होती.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *