नाशिक

आंतरराज्यीय घरफोडी व दरोडा टोळीचा पर्दाफाश

टोळीचा म्होरक्या जेरबंद; पंचवटी पोलिसांच्या गुन्हे शाखेची उल्लेखनीय कामगिरी

पंचवटी : प्रतिनिधी
नाशिक शहरातील पंचवटी, म्हसरूळ, आडगाव, इंदिरानगर, गंगापूर आदी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत तसेच शहरातील विविध भागांत घरफोड्या व दरोड्यांचे गुन्हे करणार्‍या आंतरराज्यीय टोळीचा पंचवटी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत टोळीचा मुख्य म्होरक्या धनराजसिंग बहादूरसिंग शीख (वय 23, रा. सोरापाडा, ता. अक्कलकुवा, जि. नंदुरबार) याला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून घरफोडीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सण-उत्सव व आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात गस्त वाढविणे, गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे आणि संशयितांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक 26 जुलै रोजी रात्री सुमारे 9.40 वाजता गस्त घालत असताना एन.आय.टी. महाविद्यालयासमोरील वज्रेश्वरी पाटालगतच्या रस्त्यावर 6 ते 7 संशयित इसम दोन मोटारसायकलींसह अंधारात संशयास्पद हालचाली करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच संशयितांनी पळ काढला. त्यांचा पाठलाग करून धनराजसिंग शीख याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या झडतीत काळ्या रंगाच्या बॅगेत स्क्रू-ड्रायव्हर, लोखंडी कटावणी, मिरचीपूड, सुती दोरखंड, लोखंडी कोयता आणि कानस अशी घरफोडीसाठी वापरण्यात येणारी हत्यारे व साहित्य आढळून आले. चौकशीदरम्यान त्याने फरार साथीदारांची नावे त्रिलोकसिंग सरदार (गुजरात), अमनसिंग करतारसिंग शिकलकर (गुजरात), बलवीरसिंग उर्फ गोलूसिंग राजूसिंग शिकलकर (मध्य प्रदेश), आझादसिंग सतनामसिंग शिकलकर (गुजरात) आणि अनमोलसिंग हरबंशसिंग (मध्य प्रदेश) अशी सांगितली. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 405/2026 नुसार भारतीय न्याय संहिता कलम 310(4), भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सखोल चौकशीत आरोपीने पंचवटी, म्हसरूळ, आडगाव, इंदिरानगर, गंगापूर तसेच नाशिक शहरातील विविध भागांत घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे. या कारवाईमुळे पंचवटी, आडगाव आणि म्हसरूळ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण 13 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ-1) मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील आणि पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाठ, उपनिरीक्षक पंकज सोनवणे तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत बोरसे करीत आहेत.

Inter-state housebreaking and dacoity gang busted.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

अर्ध्यावरचा डाव

- अ‍ॅड. प्रतीक्षा चौधरी पावसाळ्याची सकाळ होती. सगळीकडे चिंब असं वातावरण झालेलं होतं. आज आमच्या…

18 hours ago

प्रेम म्हणजे आयुष्य… की आयुष्याचा एक भाग

- अमोल जगताप नाशिकमध्ये नुकतीच घडलेली एक हृदयद्रावक घटना संपूर्ण समाजाला अंतर्मुख करून गेली. प्रेमसंबंधातून…

18 hours ago

‘जेन झी’ला आधी समजून घ्या!

- प्रा. योगेश हांडगे आजच्या घरात, महाविद्यालयात, कार्यालयात किंवा समाजात एक पिढी सतत चर्चेत आहे-जेन…

18 hours ago

तांबटी तलावाला दीड कोटीतून नवसंजीवनी

आमदार डॉ. राहुल आहेरांंच्या पाठपुराव्याला यश; लोकार्पण, जलपूजन चांदवड : वार्ताहर तालुक्यातील वडबारे येथील तांबटी…

18 hours ago

पेपरफुटीमुक्त परीक्षा : विधेयकापासून विश्वासार्ह व्यवस्थेकडे

परीक्षा म्हणजे केवळ गुणांची स्पर्धा नसते; ती विद्यार्थ्यांच्या मेहनतीची, प्रामाणिकतेची आणि भविष्यातील संधींची खरी कसोटी…

18 hours ago

तांत्रिक चूक

फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सची कंपनी असलेल्या मेटा कंपनीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…

18 hours ago