राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय

भारतीयांना थेट ग्रीन कार्ड देणारे विधेयक अमेरिकी संसदेत

’इमिग्रेशन अ‍ॅक्ट 1929’ सुधारणा विधेयक मांडले गेल्यास एच-1 बी व्हिसाधारकांना फायदा

वॉशिंग्टन/नवी दिल्ली 
अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पक्षाचे सिनेटर्स आणि खासदार अ‍ॅलेक्स पाडिला यांनी ‘रिन्यूइंग इमिग्रेशन प्रोव्हिजन ऑफ द इमिग्रेशन क्ट 1929’ हे विधेयक लवकरात लवकर संमत करण्याचा आग्रह धरला आहे. सध्याच्या अमेरिकन कायद्यानुसार, 1 जानेवारी 1972 पूर्वीपासून अमेरिकेत वास्तव्यास असणार्‍यांनाच ‘रजिस्ट्री’ नियमांतर्गत ग्रीन कार्ड (कायमचे रहिवासी पद) मिळते. या विधेयकाद्वारे ही 50 वर्षांहून अधिक जुनी स्थिर तारीख रद्द करून ‘7 वर्षांचे निरंतर वास्तव’ ही नवी अट लागू करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
हे विधेयक मंजूर झाल्यास रोजगारावर आधारित ग्रीन कार्डच्या प्रदीर्घ वेटिंग लिस्ट आणि प्रति-देश 7% मर्यादा या चक्रव्यूहात अडकलेल्या हजारो भारतीय एच-1बी व्हिसाधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सध्याच्या नियमांमुळे हजारो कुशल भारतीय तंत्रज्ञ आणि आयटी व्यावसायिकांना ग्रीन कार्डसाठी अनेक दशके वाट पहावी लागत आहे. जर या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाले तर अमेरिकेत सलग 7 वर्षे कायदेशीर किंवा अनधिकृतपणे राहणारे व्यावसायिक थेट ग्रीन कार्डसाठी पात्र ठरतील आणि त्यांचा रोजगार-आधारित बॅकलॉगचा मार्ग टळेल. तथापि, अमेरिकन संसदेत (काँग्रेस) हे विधेयक संमत होणे अत्यंत आव्हानात्मक मानले जात आहे. रिपब्लिकन पक्षाचे बहुसंख्य खासदार या विधेयकाला विरोध करत असून, त्यांनी याला ‘माफी योजना’ असे संबोधले आहे. हे विधेयक मंजूर झाल्यास लाखो भारतीयांचे अमेरिकेतील राहणीमान आणि स्थैर्य पूर्णपणे बदलू शकते.

भारतीय आयटी व्यावसायिकांना लाभ
या प्रस्तावित बदलाचा फायदा केवळ एच-1बी व्हिसाधारकांनाच नव्हे, तर ’ड्रीमर’ तात्पुरते संरक्षण मिळालेले नागरिक (टीपीएस होल्डर्स) आणि व्हिसाधारकांची अमेरिकेतच लहानाची मोठी झालेली मुले (डॉक्युमेंटेड ड्रीमर्स) यांनाही मिळणार आहे. अंदाजे 80 लाखांहून अधिक स्थलांतरितांना या कायद्याचा फायदा होऊ शकतो. रोजगार-आधारित प्रक्रियेतील नोकरी बदलण्यावरील बंधने आणि कुटुंबाच्या अनिश्चित भविष्यापासून यामुळे भारतीय आयटी व्यावसायिकांची सुटका होऊ शकते.

 

Bill granting direct Green Cards to Indians introduced in US Congress.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

2 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

2 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

3 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

3 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

3 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

3 hours ago