आयपीएल अर्थात, इंडियन प्रीमियर लीगचे हे एकोणिसावे वर्ष आहे. सलग एकोणीस वर्षे आपली लोकप्रियता टिकवून ठेवणारी आयपीएल ही जगातील एकमेव क्रिकेट लीग आहे. गेली अठरा वर्षे केवळ भारतातीलच नाही, तर जगातील सर्वाधिक लोकप्रिय क्रिकेट लीग म्हणून आयपीएलकडे पाहिले जाते. जगभरातील अनेक दिग्गज खेळाडू या लीगमध्ये सहभागी होतात. मुळातच क्रिकेटला एका धर्माचे स्थान असलेल्या आपल्या देशात आयपीएल सुरू असल्याने सहभागी संघांचे फॅन फॉलोअर्सची संख्यादेखील खूप मोठी आहे.
आपल्या आवडत्या संघाला पाठिंबा देण्यासाठी त्या-त्या संघाचे चाहते मैदानावर गर्दी करताना दिसतात. आयपीएलचा सामना कोणत्याही मैदानावर, कोणत्याही शहरांमध्ये असो, क्रिकेट रसिकांच्या उदंड प्रतिसादामुळे मैदाने तुडुंब भरल्याचे चित्र आपण दरवर्षीच पाहतो. मात्र, यावर्षी मैदानासोबतच मैदानाबाहेरही आपल्या आवडत्या संघाला पाठिंबा देण्यासाठी चाहत्यांमध्ये स्पर्धा लागली आहे. आजचे युग सोशल मीडियाचे युग आहे. सोशल मीडियाचा वापर न करणारा क्रिकेट चाहता शोधूनही सापडणार नाही. आयपीएलमध्ये सहभागी असणार्या सर्वच्या सर्व म्हणजे दहाच्या दहा संघांचे स्वतंत्र सोशल मीडिया अकाउंट आहेत. प्रत्येक संघाला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटरवर फॉलो करणारे कोट्यवधी फॉलोअर्स आहेत. हे फॉलोअर्स विविध सोशल मीडिया साइटवरून आपल्या आवडत्या संघाला पाठिंबा देत असतात.
आयपीएलची मॅच चालू असताना ट्विट्स, पोस्ट, व्हिडिओज आणि मीम्सचा अक्षरशः पाऊस पडतो. सेकंदाला हजारो ट्विट्स, पोस्ट आणि व्हिडिओज येत असतात. जो तो आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी ट्विट आणि पोस्ट करत असतात. या सर्वांमध्ये मुंबई इंडियन्सचे फॅन फॉलोअर्स सर्वांत जास्त आहेत. ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्रामप्रमाणेच व्हॉट्सअॅपवरदेखील चाहते आपल्या संघाला सपोर्ट करीत असतात. आपल्या आवडत्या संघाचा सामना असेल तर चाहते आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवतात. सध्या सोशल मीडियाचं चित्र पाहिलं तर मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज व आरसीबी अर्थात, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या तीन संघांना सोशल मीडियावर चाहत्यांचा सर्वांत जास्त सपोर्ट मिळताना दिसत आहे. खेळाडूंमध्ये सवार्ंत जास्त सपोर्ट रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू अर्थात, आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहली याला मिळत आहे.
आंतरराष्ट्रीय टी- 20 क्रिकेटमधून निवृत्त झाला तरी विराटची लोकप्रियता तसूभरही कमी झाली नाही. उलट वाढतच चालली आहे, हे सोशल मीडियावरून लक्षात येते. मागील वर्षी चेन्नई सुपर किंग्जच्या महेंद्रसिंह धोनी याला सोशल मीडियावरून सर्वाधिक सपोर्ट मिळाला होता. यावर्षी दुखापतीमुळे तो अद्याप एकही सामना खेळू शकला नाही, पण तो जेव्हा मैदानात उतरेल तेव्हा चाहतेही मीडियावर कल्ला करतील, यात शंका नाही. विराट कोहली आणि धोनी यांसारख्या ज्येष्ठ खेळाडूंनाच नाही, तर नवख्या खेळाडूंनाही चाहते सपोर्ट करत आहेत. राजस्थान रॉयल्स संघाचा 15 वर्षीय युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी हा आपल्या धडाकेबाज फलंदाजीने चांगलाच झोतात आला आहे. मैदानाप्रमाणेच तो सोशल मीडियावरदेखील झोतात आहे. सोशल मीडियावरून त्याचे कौतुक करताना चाहते थकत नाहीत. हे झाले खेळाडूंबाबत. संघाच्या बाबतीत विचार करायचा झाला तर आरसीबीच्या संघाला सर्वाधिक सपोर्ट मिळत आहे.
आरसीबीच्या सामन्याला प्रेक्षकांचा सर्वाधिक प्रतिसाद मिळत आहे. टीव्ही असो की मोबाइल, सर्वाधिक पाहिले जाणारे सामने हे आरसीबीचेच असतात. आरसीबीप्रमाणे मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स, पंजाब आणि हैदराबाद या संघांच्या सामन्यालादेखील मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो. यावर्षीची आयपीएल कोणता संघ जिंकणार यावर चाहत्यांमध्ये पैजा लागत आहेत. सामना संपल्यानंतर मॅचवर आधारित तसेच प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंच्या खिल्ली उडवणार्या मजेशीर मीम्स बनवून व्हायरल केल्या जात आहेत. हे मीम्स बोलके असतात. यातून करमणूक तर होतेच, पण संघाची सद्यःस्थिती काय आहे हेदेखील समजते. चेन्नई, मुंबई आणि कोलकाता हे संघ पॉइंट टेबलमध्ये तळाशी आहेत. पाच वेळेचा विजेता मुंबई फक्त एक सामना जिंकू शकला तर तीन वेळेचा विजेता कोलकाता अद्याप एकही सामना जिंकू शकला नाही. चेन्नईनेही पाच वेळा विजेतेपद मिळवले असले तर त्यांनाही अद्याप सूर गवसलेला नाही. त्यामुळे या तीन संघांची आणि त्यांच्या खेळाडूंची सोशल मीडियावर चांगलीच खिल्ली उडवली जात आहे. चाहते सोशल मीडियावर मजेशीर मीम्स, मेसेज करत आपल्या संघाला सपोर्ट करतानाच प्रतिस्पर्धी संघाची खिल्ली उडवून आयपीएलचा फीव्हर आणखी वाढवत आहे. एकूणच केवळ मैदानावरच नव्हे, सोशल मीडियावर देखील आयपीएलचा फीव्हर वाढल्याचे दिसत आहे.
‘IPL’ fever on social media too; interests should be protected!
चार वर्षांपूर्वी म्हणजे 24 फेब्रुवारी 2022 रोजी रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाले. या युद्धाचा परिणाम जगावर…
पालकांना पसंतीच्या दुकानांतून खरेदीची मुभा; शिक्षण विभागाचे परिपत्रक सिन्नर : प्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या गणवेश, वह्या-पुस्तके तसेच…
‘आयपीएल’च्या धर्तीवर खेळाडूंचा लिलाव; 16 संघांमध्ये रंगणार टेनिस बॉल डे-नाईट स्पर्धा सिन्नर : प्रतिनिधी सिन्नर…
उपजिल्हा रुग्णालयातील प्रकार कळवण : प्रतिनिधी प्रसूतीसाठी कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या मातेचा प्रसूतीनंतर काही…
नाशिक : प्रतिनिधी शहरात अलीकडे घडलेल्या विविध घटनांमधून महिलांचे लैंगिक शोषण तसेच धर्मांतरणासारख्या प्रकारांचा पर्दाफाश…
सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, दिंडोरीत सर्वाधिक मृत्यू नाशिक : देवयानी सोनार मालेगाव येथील साक्षी वनीस व सीमा…