सिडको : प्रतिनिधी
अंबड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महालक्ष्मी नगर परिसरात जुन्या वादातून एका युवकाचा कोयत्याने खून झाल्याची घटना समोर आली असून परिसरात खळबळ उडाली आहे.
विशाल हिरवाळे असे मृत युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री सुमारे साडेदहाच्या सुमारास कुलदीप भीमराव ऊचीत आणि पियुष रवींद्र वाघ (दोघेही रा. घरकुल) यांनी पूर्वीच्या वादाच्या कारणावरून विशालवर धारदार कोयत्याने वार केले. गंभीर जखमी अवस्थेत त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच अंबड एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपास सुरू केला. या प्रकरणी दोन्ही संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून सखोल चौकशी सुरू आहे.
या हत्येमागील नेमके कारण तसेच इतर कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था अधिक कडक करण्याची मागणी केली आहे.
Mangesh Shirole, the spirited Deputy Mayor striving for the development of Igatpuri.
- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…
Simhastha: Not merely a celebration of faith, but a blueprint for Nashik's future.
The Sacred Vessel of Spirituality: The Holy Site of Nashik