नाशिक

जुने नाशिक परिसरात अनियमित पाणीपुरवठा

संकट गंभीर, निष्काळजीपणामुळे नागरिकांचे मात्र हाल

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून होणारा अनियमित पाणीपुरवठा नागरिकांसाठी मोठी समस्या ठरत आहे. आज, दि. 22 सप्टेंबर 2025 रोजी गुप्तावाडा परिसरात सकाळचा पाणीपुरवठाच झाला नाही, तर इतर भागात अत्यंत कमी दाबाने पाणी आले. गुप्तावाडा परिसरात अनेक वर्षांपासून संध्याकाळी पाणीपुरवठा होत नाही.
गुप्तावाडा, गोरेराम लेन, रविवार पेठ, सराफ बाजार या परिसरातील नागरिकांना सोमवारी सकाळी कमी दाबाने पाणी मिळाले, तर गुप्तावाडा परीसरात पाणीच आले नाही. घनकर लेन जलकुंभातून या भागातील पाणीपुरवठा होत असतो, परंतु अनेक वर्षांपासूनची ही अडचण कायम आहे. गुप्तावाडा परिसरात संध्याकाळी पाणीपुरवठा होत नाही, तर सकाळीही पाणी आले नाही.
विशेषत: सकाळी गृहिणी, शाळकरी मुले व कामावर जाणार्‍या व्यक्तींना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पाणीपुरवठा व्यवस्थेची दयनीय स्थिती आहे. 5 सप्टेंबर रोजी घनकर लेन जलकुंभ परिसरात पाणीपुरवठा उशिरा झाला होता. 5 सप्टेंबरला सकाळी 7 वाजता आणि 7 सप्टेंबरला सकाळी 7.45 वाजता पाणी आले होते. यावेळी व्हॉल्व्हमनने झोपेची कारणे दिली होती. यापूर्वीही अशी प्रकरणे झाली आहेत. या गंभीर समस्येसाठी सकाळ व संध्याकाळच्या शिफ्टमधील व्हॉल्व्हमनांना जबाबदार धरले जात आहे.
व्हॉल्व्हमन कारणे देत असून, त्यांच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. अनेक वेळा तक्रारी करूनही पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी येऊन खड्डे खणून काम केल्याचे भासवत दोन-तीन दिवस पाणीपुरवठा व्यवस्थित होतो. परंतु त्यानंतर पुन्हा परिस्थिती जैसे थे होते. नागरिकांना या फसवणुकीचा अनुभव येत असून, कायमस्वरूपी तोडगा न निघाल्याने त्रास सुरूच आहे.

संपूर्ण नाशिक शहरात पाणीटंचाई

केवळ घनकर लेन आणि गुप्तावाडा परिसरच नव्हे, तर जुने नाशिक, पंचवटी विभाग, सिडको, इंदिरानगरसह संपूर्ण नाशिक शहरामध्ये पाणीपुरवठा विभागातील बेजबाबदारी दिसून येतेे. कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा आणि उशिरा येणारे पाणी यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. नाशिकची सिंहस्थ कुंभमेळ्यात निर्माण झालेली प्रतिमा या पाणीपुरवठा समस्यांमुळे धूसर होण्याची शक्यता आहे. तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणार्‍या नाशिकमध्ये मूलभूत सुविधांची कमतरता नागरिकांच्या आस्थेवर परिणाम करू शकते.

अद्याप ठोस तोडगा नाही

दररोज वर्तमानपत्रांमध्ये पाणीपुरवठा समस्यांच्या बातम्या येत असल्या, तरी नाशिक महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून अद्याप कोणताही ठोस तोडगा निघाला नाही. नागरिकांच्या तक्रारी वाढत असूनही प्रशासन मौन बाळगत आहे. तत्काळ पाणीपुरवठा व्यवस्था सुधारावी, व्हॉल्व्हमनवर कठोर कारवाई करावी, नियमित व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करावा, गुप्तावाडा परिसरात संध्याकाळचा पाणीपुरवठा सुरू करावा, तात्पुरत्या कामांऐवजी कायमस्वरूपी तोडगा काढावा. पाणी हा जीवनाचा आधार असून, या मूलभूत गरजेबाबत प्रशासनाची निष्काळजी चिंताजनक आहे. तक्रारी करूनही तात्पुरते काम करून नागरिकांची फसवणूक करण्याऐवजी स्थायी उपाययोजना करण्याची गरज आहे.

 

 

Editorial Team

Recent Posts

राज्यसभेची उमेदवारी भुजबळ यांच्याऐवजी या नेत्याला, तटकरे यांनी दिली माहिती

मुंबई: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या रिक्त झालेल्या जागेवर मंत्री छगन भुजबळ यांना संधी दिली जाईल,…

8 hours ago

पावसाच्या सरींसोबतच घरोघरी लोणचे बनवण्याची लगबग

बाजारात गावरान कैर्‍यांची धूम, महागाईमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले दिंडोरी : प्रतिनिधी पहिल्या मान्सूनपूर्व पावसाच्या आगमनाने…

2 days ago

त्र्यंबकेश्वरमध्ये अनिर्बंध लॉजिंग बांधकामांना वेग

कुंभमेळ्याच्या नावाखाली सुरक्षेचे नियम धाब्यावर; यंत्रणांचे सोयीस्कर दुर्लक्ष त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळा तोंडावर असल्याने…

2 days ago

‘धाडसत्र’ केवळ ‘दिखावा’ ठरू नये…

ज्याची ’सांस्कृतिक राजधानी’ आणि ’विद्येचे माहेरघर’ असे संबोधल्या जाणार्‍या पुणे शहराचा गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढतच…

2 days ago

राजं छत्रपती झालं!

सहा जून ही तारीख भारतीय इतिहासाला कलाटणी देऊन सुवर्णाक्षरात कोरली गेलेली आहे. तीन शतकांच्या पारतंत्र्यानंतर…

2 days ago

इबोलाचा नवा अवतार

इबोला नावाच्या विषाणूने आफ्रिकन देशांना विशेषतः काँगोला ग्रासले आहे. हा विषाणू नवनव्या रूपात प्रकट होत…

2 days ago