मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील खासगी रुग्णालयांनी दर्शनी भागात उपचारांचे दरफलक लावणे बंधनकारक असून, त्यानुसारच रुग्णांकडून देयके आकारावीत. तसेच महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत नियमबाह्य पद्धतीने रुग्णांकडून अतिरिक्त पैसे घेणार्या रुग्णालयांवर कारवाई करण्यात येईल. प्रसंगी संबंधित रुग्णालयांना ब्लॅकलिस्टही केले जाईल, असे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत सांगितले.
सदस्य बापूसाहेब पठारे यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली. त्यावरील चर्चेत सदस्य नमिता मुंदडा, मनीषा चौधरी, सुलभा खोडके, श्वेता महाले, ज्योती गायकवाड, मुरजी पटेल, संजय केळकर, नितीन राऊत, सत्यजित देशमुख आणि सुनील शेळके यांनी सहभाग घेतला.
मंत्री आबिटकर म्हणाले की, राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये बेडची संख्या वाढविण्यासाठी समिती नेमून निर्णय घेतला जाईल. त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत संबंधित अधिकार्यांसोबत स्वतंत्र बैठका घेण्यात येतील. ग्रामीण भागातील डॉक्टरांनी रुग्णांना शहरातील रुग्णालयांत उपचारासाठी पाठविताना संबंधित रुग्णालयात शासकीय आरोग्य योजनेचा लाभ उपलब्ध आहे का, याची माहिती घेऊन रुग्णांना योग्य मार्गदर्शन करावे, असेही त्यांनी सांगितले.
शासकीय आरोग्य योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
राज्यात नवजात बालकांच्या उपचारासाठी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत 66 ठिकाणी विशेष नवजात काळजी कक्ष सुरू करण्यात आले आहेत. या कक्षांमध्ये गंभीर आजारी नवजात बालकांवर सर्फेक्टंट आणि कॅफीनद्वारे उपचार केले जातात. आवश्यकतेनुसार सीपीएपीचा वापर केला जातो. तसेच जन्मजात आंधळेपणा (रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी) आणि जन्मजात बहिरेपणाच्या तपासण्या मोफत केल्या जात असल्याची माहितीही मंत्री आबिटकर यांनी दिली. आर्थिक दुर्बल रुग्णांना शासकीय आरोग्य योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधींसह सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
It is mandatory for private hospitals to display rate cards for treatments.
आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी कित्येक वर्षे जी माणसे आपल्या आयुष्याच्या पवित्र समिधा आयुष्यभर राष्ट्र उद्धाराच्या अग्निकुंडात…
किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 दरम्यान पार पडलेल्या शांघाय सहकार्य…
घनकचरा विभागाचे पथक तैनात नाशिक : प्रतिनिधी वाढत्या बांधकाम क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व पाडकामातून निर्माण…
शहा विद्यालयाच्या सहा एकर परिसरात 850 हून अधिक वृक्ष सिन्नर : प्रतिनिधी फळ्यावर अक्षरे गिरविणारे…
दिवसा वीज मिळेना, रात्री अंधारामुळे बिबट्याची भीती; दुग्ध व्यवसायालाही फटका सिन्नर : प्रतिनिधी ग्रामीण भागात…
708 शिक्षकांची होणार भरती; पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त…