– अफजल पठाण
जुल्म कितना भी हो,
हक की आवाज दबती नहीं,
सच की राह कभी आसान होती नहीं
मगर जब हाथ में कानून की ताकद होती है,
तो इन्साफ की उम्मीद
कभी खत्म होती नहीं।
जीवनात काही प्रसंग माणसाला आतून हादरवून टाकतात. घरातील वाद, जमिनीचा प्रश्न, वारसाहक्काचा संघर्ष, फसवणूक, कौटुंबिक कलह, अपघात किंवा अन्याय यावेळी सामान्य माणसाला कायदा आणि न्यायालयीन प्रक्रिया माहीत नसते. अशा वेळी त्याच्या आयुष्यात एक व्यक्ती येते तो म्हणजे वकील!
वकील म्हणजे केवळ काळा कोट घालून न्यायालयात उभा राहणारी व्यक्ती नसून तो एखाद्या कुटुंबाच्या आशेचा किरण, पीडिताचा आवाज आणि अन्याय झालेल्या व्यक्तीच्या मनात पुन्हा न्याय मिळण्याची आशा निर्माण करणारा विश्वास असतो. न्यायालयात वकील आपल्या अशिलाच्या बाजूने युक्तिवाद करतो, तेव्हा त्याच्या मागे केवळ एक केस नसते; त्या मागे एखाद्या आईचे अश्रू, वडिलांची चिंता, मुलांचे भविष्य आणि कधी कधी संपूर्ण आयुष्याची कमाई पणाला लागलेली असते. म्हणून वकिलांचे काम फक्त कायद्याची कलमे सांगणे नाही, तर त्या कलमांच्या मागे असलेला माणूस समजून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. एखादा गरीब माणूस हातात कागदांची फाइल घेऊन वकिलांच्या कार्यालयात येतो. त्याला फक्त एवढेच माहीत असते की, माझ्यावर अन्याय झाला असून, मला न्याय हवा आहे. अशा वेळी वकिलाचा एक विश्वास देणारा शब्दही त्या व्यक्तीसाठी मोठा आधार ठरतो काळजी करू नका, आपण कायदेशीर मार्गाने लढू.
कायद्याची पुस्तके सामान्य माणसाला अवघड वाटू शकतात व न्यायालयीन प्रक्रिया गुंतागुंतीची वाटू शकते. अशा वेळी कायद्याचा अर्थ सोप्या भाषेत समजावून सांगणारा व योग्य मार्ग दाखवणारा वकील सामान्य नागरिकासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो. म्हणूनच वकील हा न्यायव्यवस्था आणि सामान्य जनता यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहे. न्यायालयात एखादी फाइल असते, केस नंबर असतो, तारीख असते; पण त्या कागदांच्या मागे माणसांची आयुष्ये असतात. एखाद्या भावाचा भावाशी जमिनीवरून वाद असतो, एखादी मुलगी आपल्या हक्कासाठी लढत असते, एखादा वृद्ध आपल्या मालमत्तेसाठी न्याय मागत असतो किंवा एखादे कुटुंब अपघातानंतर आर्थिक संकटात सापडलेले असते. प्रत्येकाची कहाणी वेगळी असते; पण अपेक्षा एकच की, मला न्याय मिळावा.
आपण अनेकदा न्यायालयात फक्त निकाल पाहतो; परंतु त्या निकालापर्यंत पोहोचण्यासाठी वकिलाने केलेला अभ्यास, कागदपत्रांची छाननी, कायद्याच्या तरतुदींचे विश्लेषण आणि युक्तिवादाची तयारी यामागे मोठी मेहनत असते. एक चांगला वकील आपल्या अशिलाची बाजू मांडताना कायदा, पुरावे आणि वस्तुस्थिती यांना महत्त्व देतो. कारण न्यायालयात केवळ भावना पुरेशी नसते; त्या भावनेला कायद्याची साथ व पुराव्याची ताकद आवश्यक असते. वकिलांची भूमिका केवळ न्यायालयापुरती मर्यादित नाही. कायदेविषयक जनजागृती, महिलांचे अधिकार, ज्येष्ठ नागरिकांचे हक्क, वारसाहक्क, मालमत्ता व्यवहार आणि कौटुंबिक वाद अशा अनेक विषयांवर समाजाला योग्य मार्गदर्शन करण्याची जबाबदारीही वकिलांवर आहे. एखादा वाद न्यायालयात जाण्यापूर्वीच कायदेशीर मार्गाने मिटवता आला आणि वर्षानुवर्षे चालणारा संघर्ष टाळता आला, तर त्याहून मोठा विजय कोणता? वकील जेव्हा न्यायालयात उभा राहतो, तेव्हा त्याच्या आवाजात केवळ शब्द नसतात; त्या आवाजात आपल्या अशिलाची अपेक्षा असते. त्याच्या हातात केवळ कायद्याची पुस्तके नसतात, तर पुस्तकांच्या पानांमध्ये कोणाचे तरी भविष्य दडलेले असते. अन्यायाच्या अंधारात न्यायाची वाट दाखवणारा, कायद्याच्या गुंतागुंतीतून सामान्य माणसाला मार्ग काढून देणारा व संकटाच्या काळात मी तुमच्यासोबत आहे असा विश्वास देणारा व्यक्ती म्हणजे वकील.
वकिली हा केवळ व्यवसाय नाही, हा ज्ञानाचा, संयमाचा, संघर्षाचा व सामाजिक जबाबदारीचा प्रवास आहे. वकील फक्त केस लढत नाही; तो माणसाच्या न्यायासाठी लढतो. तो फक्त युक्तिवाद करत नाही; तो एखाद्याचा आवाज बनतो. तो फक्त कायदा सांगत नाही. तो सामान्य माणसाला त्याचा हक्क समजावून देतो. म्हणूनच न्यायाच्या या प्रवासात योगदान देणार्या प्रत्येक वकिलाला व न्यायासाठी लढणार्या प्रत्येक हाताला मनापासून सलाम!
It is not merely the legal profession; it is the responsibility of dispensing justice…
- आनंदा जाधव शासनाने राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर केला. त्यानंतर दुसर्या यादीत राहिलेले तालुके समाविष्ट…
- प्रशांत पोतदार क्षणभर कल्पना करून बघा बरं. मीच जर माझ्या कुटुंबात नसेल तर? असा…
- अश्विनी पांडे सिंहस्थाच्या कामांना सुरुवात होण्यास झालेला विलंब, निविदाप्रक्रिया आणि निधी मंजुरीसाठी लागलेला वेळ,…
- गोरख काळे महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदाची प्रक्रिया सुरू झाली असून, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महासभा होऊन…
तव प्रतिभेचे रंग किती तू मज दाखवले साक्षात्कार, विभावन, अनुभूती, दृष्टान्त असे सगळे एकाच जन्मी…
रशियाकडून तेल घेऊ नका, अशी दवंडी पिटणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर…