ऑपरेशन करायला वाघाचे काळीज लागते

मुंबई : प्रतिनिधी
मी डॉक्टर नसलो तरी ऑपरेशन करतो. ऑपरेशन करायला वाघाचे काळीज लागते. लांडग्याचे नाही. घरात बसून कामे करता येत नाहीत, अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. हे काय आम्हाला चॅलेंज देणार? आता म्हणतात तुडवा. हिंमत असेल तर समोर या. तुडवायला पाय लागतात. तुम्ही आला तर हे शिवसैनिक तुमचे पाय जागेवर ठेवतील का? असा इशाराही एकनाथ शिंदे यांनी दिला.
शिवसेनेचा 60 वर्धापन दिन नेस्को सेंटरमध्ये झाला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे कौतुक केले. त्याचवेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.
शिंदे म्हणाले की, रक्ताचे नाते सांगून कोणी वारस होत नाही.सातबार्‍यावर नाव लावून कोणी वारस होत नाही. शिवसेना म्हणजे जमिनीचा तुकडा नाही. शिवसेना म्हणजे काळजाचा तुकडा आहे. बाळासाहेबांच्या हयातीत तुम्ही त्यांना त्रास देत होता. बाळासाहेब गेल्यानंतर त्यांना तिरस्कार असलेल्या लोकांचा पुरस्कार तुम्ही केला. शिवसेना पहिल्यांदा कोणी फोडली तर ती राष्ट्रवादीने. दुसर्‍यांदा कोणी फोडली तर ती काँग्रेसने. ते यांना पुढे करतात आणि ज्याने शिवसेनेचा भगवा यातून मुक्त केला त्याच्यावर टीका करतात.
शिंदे म्हणाले, की आमदार, मंत्र्याचा मुलगा आहे म्हणून संधी देणार नाही. त्याचे जर कर्तृत्व असेल, काम केले तर त्याकडे दुर्लक्षही करणार नाही. पक्ष म्हणजे आमदार-खासदार नाही, मंत्री नाही, तर पक्ष म्हणजे शिवसैनिक आहे. त्यांना जपले पाहिजे. निवडणुकीनंतरही कार्यकर्ता हा आवडताच असला पाहिजे. कार्यकर्ता वाढला पाहिजे, तरच पक्ष वाढेल.
माझ्याकडे वशिला लागत नाही, पैसे लागत नाहीत, मर्सिडीस लागत नाही, माझे लक्ष सगळ्यांकडे असते. त्यामुळेच आपण भीमाच्या पोरीला, ज्योती वाघमारेला राज्यसभा खासदारकेलं. त्यामुळे सर्वसामान्य शिवसैनिकाला आपण संधी देतो, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
आनंद दिघे पाठीशी होते. त्यावेळी डोंगराएवढं दुःख होतं. आनंद दिघे आणि बाळासाहेब सोडून गेले. आज माझे नेते, कार्यकर्ते हेच माझे कुटुंब आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले. देवेंद्र फडणवीस आणि माझ्यामध्ये खोडा घालायचा प्रयत्न काही लोक करतात. पण आम्ही खुर्चीसाठी एकत्र आलो नाही. कुछ लोग छुप छुप कर उन्हे बताते है, वो सब आकर हमें बताते है, असंही ते म्हणाले.

जो भगव्याला विसरला तो संपला
शिवसेना म्हणजे भगवे वादळ आहे. जो भगव्याला विसरला तो राजकारणातून संपला. बाळासाहेबांना ज्यांचा तिरस्कार होता त्यांचा तुम्ही जयजयकार करता, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली. आम्ही शिवसेना पुढे नेण्याचे काम केले त्यांना तुम्ही शिव्या देताय. आपला उठाव सुपरहीट झाला. जनतेनी स्वीकारल्याचे शिंदे म्हणाले. आम्ही जनतेच्या न्यायालयात जिंकलो. उठाव केला तेव्हा म्हणाले, कोणीही निवडून येणार नाही. सोबत राहणार नाही. पण मी म्हणालो होतो, एकही निवडून नाही आलो तर राजकारण सोडून देईन आणि गावाकडे शेती करायला जाईन. पण आपण 60 आमदार निवडून आणल्याचे शिंदे म्हणाले.

It takes the heart of a tiger to perform the operation.

 

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

14 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

14 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

14 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

15 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

15 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

15 hours ago