नाशिक

अंत्यविधीनंतर स्मशानभूमीतच दागिन्यांवर डल्ला

झोपडी करून राहणार्‍या व्यक्तीकडे दागिने सापडल्याने खळबळ

सिडको : दिलीपराज सोनार
सकाळी अंत्यविधी… सायंकाळी राखेचा कार्यक्रम… मृत व्यक्तीच्या नातेवाइकांच्या डोळ्यासमोर अजूनही अंत्यविधीचे दृश्य ताजे असतानाच अंबडच्या स्मशानभूमीत धक्कादायक प्रकार समोर आला. राखेच्या कार्यक्रमासाठी सायंकाळी पाच वाजता स्मशानभूमीत पोहोचलेल्या नातेवाइकांना चांदीचे जोडवे व अन्य दागिने गायब असल्याचे निदर्शनास आले. काही वेळापूर्वीच अंत्यविधी झालेल्या ठिकाणी दागिने गायब झाल्याने उपस्थितांमध्ये संताप व अस्वस्थता पसरली.
नातेवाईक आणि ग्रामस्थांनी स्मशानभूमीचा परिसर पिंजून काढत दागिन्यांचा शोध सुरू केला. शोधाशोध सुरू असतानाच स्मशानभूमीच्या मागील बाजूस पायर्‍यांखाली झोपडी करून राहणार्‍या एका व्यक्तीवर संशय गेला. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्याकडून संबंधित चांदीचे दागिने आढळून आल्याचे नातेवाइकांनी सांगितले.
विशेष म्हणजे, त्याच्याकडे आणखी काही चांदीचे दागिनेही आढळल्याचे समोर आले. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव राहुलकुमार रणजित सिंग (रा. भागलपूर, जगदीशपूर, बिहार)असे सांगितले. आपण पूजापाठ करण्यासाठी येथे राहत असल्याचे त्याने सांगितले. मात्र, त्याच्याकडे चांदीचे दागिने आढळल्याने उपस्थितांच्या संशयाला अधिकच बळ मिळाले आणि परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले.
ज्या ठिकाणी काही तासांपूर्वी एका व्यक्तीला अखेरचा निरोप देण्यात आला, त्याच स्मशानभूमीत राखेचा कार्यक्रम सुरू असताना दागिने गायब झाल्याचे समोर आल्याने या घटनेने नातेवाइकांना मोठा धक्का बसला.
दुःखाच्या प्रसंगी आलेल्या कुटुंबीयांना मृत व्यक्तीच्या आठवणींसोबतच चोरीच्या घटनेचा सामना करावा लागल्याने वातावरण अधिकच गंभीर झाले. या प्रकारामुळे स्मशानभूमीची सुरक्षितता आणि तेथे अनोळखी व्यक्तींच्या वास्तव्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संशयित व्यक्तीकडे सापडलेले दागिने नेमके कुठून आले? त्याच्याकडे आढळलेल्या इतर दागिन्यांचा स्रोत काय आहे? आणि यापूर्वी अशा घटना घडल्या आहेत का, याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.
या घटनेची माहिती संबंधित यंत्रणेला देण्यात आली. पुढील तपासात या प्रकारामागील संपूर्ण सत्य समोर येण्याची अपेक्षा आहे. स्मशानभूमीसारख्या संवेदनशील ठिकाणी घडलेल्या या प्रकारामुळे अंबड परिसरात संतापाची लाट पसरली आहे.

Jewelry was stolen in the cemetery after the funeral.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

2 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

3 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

3 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

3 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

3 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

3 days ago