नंदुरबार :
जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते सुरुपसिंग नाईक यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. नंदुरबार जिल्ह्यात अनेक वर्षांपासून त्यांनी काँग्रेसची धुरा सांभाळली होती. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून मुंबई, बारडोली (गुजरात) आणि नंतर नवापूरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. सन 1962 मध्ये सुरुपसिंग नाईकांनी यांनी नवापूर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदापासून राजकीय प्रवासाला सुरुवात केली. 1965 साली ते धुळे जिल्हा परिषदेत सदस्य म्हणून निवडून आले. 1972 साली नवापूर विधानसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्क्याने निवडून आले. आणीबाणीच्या काळात त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून मार्च 1977 साली प्रथमच नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे तिकीट मिळाले. 1980 साली त्यांचा मोठ्या मताधिक्क्याने विजय झाला आणि ते लोकसभेत पोहोचले. त्यांनी नंतर राजीनामा दिला आणि दि. 25 सप्टेंबर 1980 रोजी महाराष्ट्र राज्यात कॅबिनेट मंत्री म्हणून काम करण्याची संधी त्यांना देण्यात आली.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…