आस्वाद

कसबा चिंचवडचे पडसाद पालिका निवडणुकीत उमटणार

गोरख काळे

 

 

 

राज्यात शिक्षक व पदवीधर विधानपरिषद निवडनुकीचा बिगूल वाजून झाल्यानंतर आता पुण्यातील कसबा व चिंचवड या दोन विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुक होत आहे. राज्यातील सत्ता उलथापालथ झाल्यानंतर पहिल्यांदाच सत्ताधारी आणि महा विकास आघाडी सरकार जनतेच्या न्यायालयात जाणार आहे. त्यामुळे राजकिय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राज्यात मागील सहा ते सात महिन्यात अशा काही घटना घडल्यात की त्या, जनसामांन्यांच्या दुष्टीने खळ्बळ उडवून देणार्‍या ठरल्या आहे. त्यामुळे जनतेच्या मनात काय आणि त्यांचा कौल काय, या सर्वांची उत्तरे कसबा व चिंचवड पोटनिवडणुकीच्या निकालातून समोर येणार आहे. मात्र या निवडणुकीत जे निकाल येतील ते आगामी नाशिकसह इतर महापालिकांच्या निवडणुकीवर त्यांचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : उद्विग्नता
नाशिक महानगरपालिकेसह राज्यातील 18 पालिकेंची निवडणूक ओबीसी आरक्षण, प्रभाग रचना या मुद्यांवरुन सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. नाशिक महापालिके तील लोकप्रतिनिधीं चा कार्यकाल 13 मार्च 2022 रोजी संपुष्टात आला. त्यानंतर निवडणूक पुढे पुढेच ढकलण्यात आली. राज्यात सत्त्ता उलथापालथ झाल्यानंतर शिंदे गटात नाशिकमधून अनेक पदाधिकार्‍यांनी प्रवेश केला. त्यामुळे पालिका निवडणुकीत नाशिककरांचा यंदा चा कल काय असणार हे, की आताच सांगणे कठीण आहे. मात्र सध्याची राज्यातील राजकीय परिस्थिती ढवळून निघाली असून अनपेक्षित घटनांमुळे जनता बुचकळ्यात पडली आहे. अनेकजण या वर संताप व्यक्त करत असल्याचे चित्र आहे. दरम्यान भाजपाने नाशिकमध्ये निवडणुकीचे रणशिंग फूकले आहेत. ना. गिरीश महाजन यांनी तर नाशिक पालिकेत पुन्हा भाजपाचीच सत्त्त्ता येणार असल्याचा दावाच करुन टाकला आहे. नुकतेच शहरात भाजपाचे दोन दिवसीय राज्य अधिवेशन झाले. या अधिवेशनाच्या माध्यमातून नाशिकमधील भाजप पदाधिकार्‍यांनी आगामी पालिका निवडणुकीचीच रणनिती असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला. राज्यात ज्या पध्दतीने महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यात आले. ते सर्वसामान्य नागरिकांना पटलेले नाही, याची परतफेड जनता करणारच असा दावा ठाकरे गटाच्या नेत्यांसह महाविकास आघाडी कडून दररोज केला जातो आहे. तर भाजप-शिंदे गटाकडून महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला करत जनतेचे सरकार आम्ही बनवले असल्याचे सांगत आहे.

कसबा आणि चिंचवड या निवडनुकीच्या माध्यमातून जनता कोणाच्या बाजूने त्यांचे मत टाकणार यावरील चित्र स्पष्ट होणार आहे. यापूर्वी राज्यात झालेल्या शिक्षक, पदवीधर विधानपरिषद निवडणुकीत महा विकास आघाडीला यश मिळाले होते. त्या निवडणुकीत शिक्षक व पदवीधरांनाच मतदानाचा हक्का होता. मात्र कसबा आणि चिंचवडच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक थेट मतदान केंद्रावर जाणार आहे. यापूर्वी मुंबइत अंधेरी पोटनिवडणुकीत जनतेच्या मनता काय हे समजून येण्यापूर्वी भाजपने माघार घेऊन टाकली होती. त्या निवडणुकीनंतर आता एकाच वेळी दोन्ही ठिकाणच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी विरुध्द भाजप-शिंदे यांच्या मध्ये समोरासमोर लढत होत आहे. या निवडणुकीच्या निकालातून मात्र नाशिक पालिका निवडणुकीत काय प्रभाव जाणवेल, यावरुन बरीच चर्चा सुरु झाली आहे. या दोन्ही ठिकानांचा कल ज्याच्या बाजूने असेल त्याच्या बाजूने जनमत असणार असे बोलले जाऊ लागले आहेत. त्यामुळे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष कसबा, चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीकडे लागले आहेत. या दोन्ही निवडणुका पुण्यात होत असल्या तरी त्यांचे पडसाद येणार्‍या नाशिक महानगर पालिका निवडणुकीत दिसून येऊ शकतात.

 

 

नाशिक पालिकेत प्रशासक राजवटीला वर्षपूर्ती

 

नाशिक महानगरपालिकेची वेळेत निवडणूक न झाल्याने 13 मार्च रोजी महापालिकेत प्रशासक राजवट येऊन वर्षपूर्ती होणार आहे. अद्यापही पालिका निवडणूक संदर्भात कोणतीही शक्यता दिसून येत नाही. परंतू ऑक्टोबर मध्ये निवडणुकीचा बिगूल वाजण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी पुणे जिल्ह्यात होणार्‍या निवडणुका एकप्रकारे जनमत चाचणी यानिमित्त्ताने होत असल्याची चर्चा नशिकच्या राजकीय वर्तुळात आहे.

 

 

….
नाशकातील शिंदे ठाकरे गट लक्ष ठेवून

 

नाशिक शहरात शिंदे गटात दाखल झालेल्या नेत्यांचे लक्ष देखील या निवडणुकीकडे लागून आहे. सध्य सोशल मीडियावर भाजपविरोधात अन शिंदे गटा विरोधात वातावरण असल्याचा दावा विरोधकांकडून वारंवार केला जातो आहे.  दरम्यान पुण्यातील निवडणुकीत शिंदे गटाचे उमेदवार नसले तरी त्याकडे नाशिकमधील शिंदे आणि ठाकरे गटाचे निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष ठेऊन आहेत.

Ashvini Pande

Recent Posts

साप्ताहिक राशिभविष्य

पुरुषोत्तम नाईक दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025 मेष : सुखवार्ता कळतील या सप्ताहात रवी,…

11 hours ago

असामान्य अभिनेत्री काळाच्या पडद्याआड

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी…

11 hours ago

गणेशोत्सवात ‘गोदावरी महाआरती’ ठरणार नाशिकचा अभिमान

देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा पंचवटी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव.…

11 hours ago

पालकमंत्रिपदाचा वाद चिघळला

गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर भुजबळांचेही प्रत्युत्तर नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर…

12 hours ago

पिनाकेश्वर घाटात ट्रॅक्टर ट्रॉली दरीत कोसळून दोन महिला ठार

बोलठाण : प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव घाटात रविवारी (दि.17) सायंकाळी…

12 hours ago

निफाड उपविभागात साडेतीन हजार स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरु

वीजचोरी रोखण्यास मदत; महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना विश्वास निफाड : विशेष प्रतिनिधी विजेची हानी तथा गळती,…

12 hours ago