कत्तलीसाठी जाणाऱ्या ४ गोवंशाची सुटका

 

 

गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे वाचले जनावरांचे प्राण

 

लासलगाव : प्रतिनिधी

 

कत्तलीसाठी चार गोवंशाला घेऊन जाणाऱ्या पीकअप गाडीला गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे लासलगाव पोलीसांनी वेळीच पकडल्याने या जनावरांचे प्राण वाचले.या प्रकरणी जनावरे घेऊन जाणाऱ्या दोघांविरुद्ध लासलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

 

या बाबत मिळालेल्या माहितीनुसार टाकळी विंचूर परिसरातील एस डी ए स्कूल समोरील रस्त्यावरून सोमवार दि १० रोजी दुपारी साडे तीन वाजेच्या दरम्यान कत्तलीसाठी चार गोवंशाला आरोपी योगेश संजय थेटे वय 24,रमजान ऊर्फ फजल शरफोदीन शेख वय 29 दोन्ही रा .पालखेड मिरची ता निफाड हे दोघे जण पीक अप क्र एम MH 15 HH 8304 या गाडीतून घेऊन जात असल्याची माहिती लासलगाव व टाकळी परिसरातील गोरक्षकांना मिळाली.

 

या घटनेची माहिती मिळताच विश्व हिंदू परिषद जिल्हा सदस्य संतोष केंदळे यांनी बजरंग दल जिल्हा संयोजक समाधान कापसे यांना वरील प्रकार सांगितला असता

कापसे यांनी लासलगाव पोलिस ठाण्यात माहिती कळवली असता पोलीस उप निरीक्षक अजिनाथ कोठाळे है पोलिस कर्मचाऱ्यांसह तसेच गोरक्षक सूरज नाईक,संजय होळकर,चिराग जोशी,अविनाश काळे.संदिप हारळे.कुणाला कवार आदी बजरंग दल चे कार्यकर्ते घटनास्थळी हजर झाले व या पीकअप गाडीला अडवून गाडीतल्या जनावरांबाबत विचारपूस केली असता या दोन्ही गुन्हेगारांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.या वेळी पिकप गाडीतील गोवंश अतिशय वाईट परिस्थितीत गाडीत बांधून कत्तलीसाठी जात असल्याचे आढळून आले.या घटनेतील गुन्हेगारांसह पीकअप गाडी व जनावरे पोलीसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास स पो नि राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पो उ नि अजिनाथ कोठाळे पोलिस कर्मचारी कैलास महाजन,प्रदीप अजगे,सागर आरोटे करत आहे

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

19 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

19 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

19 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

19 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

19 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

19 hours ago