जलशुद्धीकरण, दगडी पायर्यांची दुरुस्ती
नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळा-2027 च्या पाश्वर्र्भूमीवर त्र्यंबकेश्वर येथील पवित्र कुशावर्त तीर्थाच्या विकास व संवर्धन कामांना वेग आला आहे. या कामांसाठी बुधवार(दि. 30)पासून 31 ऑक्टोबरपर्यंत कुशावर्त तीर्थ बंद ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कुशावर्त कुंडातील पाणी शुद्धीकरण यंत्रणा, ऐतिहासिक दगडी पायर्यांची दुरुस्ती, हेरिटेज रोषणाई, नवीन ध्वजस्तंभ, तसेच परिसरातील रस्ते रुंदीकरण आणि अतिक्रमण निर्मूलनाची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कुशावर्त परिसरातील प्रवेशावर निर्बंध घालण्याची आले आहेत.
सिंहस्थाच्या काळात त्र्यंबकेश्वर येथे देशभरातून लाखो भाविक दाखल होणार असल्याने कुशावर्त तीर्थ परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार आहे. या पाश्वर्र्भूमीवर भाविकांना सुरक्षित आणि सुविधायुक्त वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडून विविध कामे केली जात आहेत. यात कुशावर्त कुंडातील पाण्याची गुणवत्ता कायम राखण्यासाठी ताशी 300 घनमीटर अर्थात तीन लाख लिटर क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येत आहे. या यंत्रणेमुळे संपूर्ण कुंडातील पाणी अवघ्या तीन तासांत शुद्ध करणे शक्य होणार आहे. सिंहस्थाच्या प्रारंभानिमित्त 31 ऑक्टोबर 2026 रोजी होणार्या ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कुशावर्त तीर्थावर भव्य ध्वजस्तंभ उभारण्यात येत आहे. ध्वजारोहणाशी संबंधित तसेच कुंडाच्या मुख्य परिसरातील अत्यावश्यक कामे 31 ऑक्टोबरपूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे या भागात 30 सप्टेंबरपासून 31 ऑक्टोबरपर्यंत भाविकांना प्रवेश बंद करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
गर्दी नियंत्रणासाठी रस्ते रुंद करणार
कुशावर्ताकडे जाणार्या मुख्य मार्गासह शाही मार्गावरील अतिक्रमणे हटविण्याची व रस्ते प्रशस्त करण्याची कामेही सुरू आहेत. सिंहस्थाच्या पर्वणीदरम्यान मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होणार असल्याने चेंगराचेंगरीसारख्या घटना टाळण्यासाठी मार्गांची क्षमता वाढविण्यावर भर देण्यात येत आहे.
Kushavarta closed from today for Simhastha-related works.
पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…
तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…
ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…
अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…
महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…
विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…