नाशिक : प्रतिनिधी
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या मुहूर्तावर शहरातील विविध गणपती मंदिरांत भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बाप्पाचे दर्शन घेतले. सकाळपासूनच मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.
दूर्वा, नारळ आणि पेढ्यांचा नैवेद्य अर्पण करून भाविकांनी गणेशाची पूजा केली. अंगारिकेनिमित्त अनेक मंदिरांत महाभिषेक, अथर्वशीर्ष पठण, गणेशयाग यांसारख्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
शहरातील ढोल्या गणपती, नवश्या गणपती यांसह रविवार कारंजा येथील गणपती मंदिरात दिवसभर भाविकांची गर्दी होती. संध्याकाळी होणार्या आरतीसाठीही परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाशिकरोड येथील इच्छामणी गणेश मंदिरात भाविकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. विविध गणेश मंदिरांत आलेल्या भाविकांना खिचडी, केळी, राजगिरा लाडू आदी पदार्थ प्रसाद म्हणून वितरित करण्यात आले.
Queues of devotees at Ganapati temples on the occasion of Angarak Chaturthi
पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…
तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…
ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…
अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…
महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…
विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…