लासलगावी कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा आक्रमक ; कांद्याचे लिलाव पाडले बंद

लासलगावी कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा आक्रमक ; कांद्याचे लिलाव पाडले बंद

लासलगाव:-समीर पठाण

केंद्र सरकारने कांद्यावरील लागू केलेले २० टक्के निर्यात शुल्क तात्काळ रद्द करून शून्य टक्के करावे या मुद्द्यावर आज सोमवारी सकाळी लासलगाव बाजार समितीच्या कांदा लिलाव आवारात राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक भारत दिघोळे व संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव काही काळासाठी बंद पाडले.या वेळी केंद्र व राज्य सरकारच्या कांदा निर्यात धोरणाविरोधात कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी  सकाळी ९ वाजता कांद्याचे लिलाव सुरु झाले.यावेळी कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचे दिसून आल्याने राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक भारत दिघोळे व संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव काही काळासाठी बंद पाडले.या वेळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

या वेळी राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केंद्र सरकारने कांद्यावरील सध्या लागू केलेले २० टक्के निर्यात शुल्क तात्काळ रद्द करून शून्य टक्के करावे व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा द्यावा अशी जोरदार मागणी या वेळी केली तसेच या बाबत केंद्र व राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या या मागणीची दखल न घेतल्यास या पुढे राज्यव्यापी रस्ता रोको,रेल रोको करून राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव बंद पाडून जेल भरो सारखे मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा भारत दिघोळे यांनी या वेळी दिला.या वेळी नाशिक जिल्हा युवक अध्यक्ष केदारनाथ नवले,चांदवड तालुका अध्यक्ष दत्तू गांगुर्डे यांच्या सह कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते साधारण अर्धा तासानंतर कांद्याचे लिलाव पूर्ववत सुरु करण्यात आले.

गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव सातत्याने घसरत आहेत.त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलेले आहेत.कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून कांदा उत्पादक करत आहेत.
खरीप हंगामातील लाल कांद्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर प्रतिक्विंटल ३००० हजार ते ३५०० रुपयांनी घसरले आहेत.यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

आज सोमवारी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लीलावच्या पहिल्या सत्रात १०८८ वाहनातून कांद्याची बम्पर आवक दाखल झाली.या कांद्याला कमीत कमी ७००/-रुपये,जास्तीत जास्त २३३२/- रुपये तर सरासरी १८२५/- रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

नाशिकचा श्वास, व्यवस्थेचा फास!

- वाहिद बागवान ब्रह्मगिरीच्या कुशीतून पाझरणारी गोदावरी, द्राक्षबागांतून आणि सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍यांतून वाहणारा मंद, शीतल वारा…

11 hours ago

समुद्राच्या पाण्यातून लिथियम

- डॉ. किशोर पवार आपल्या भूतलावर 70% भूप्रदेश सागर, महासागर यांनी व्यापलेला आहे. महासागर म्हणजे…

11 hours ago

जीवघेणे प्रदूषण आणि वाढती वाहनसंख्या

मुंबईतील वाढत्या प्रदूषणाबाबत सध्या प्रतिदिन वर्तमानपत्रांत बातम्या वाचायला मिळत आहेत. जगातील सर्वांत प्रदूषित शहरांच्या सूचीत…

11 hours ago

पाकिस्तानधार्जिणे

काश्मीरचे दोन भाग आहेत. एक पाकिस्तानात, तर दुसरा भारतात आहे. पाकिस्तानातील काश्मिरी समाधानी नाहीत. त्यांना…

11 hours ago

पिंपळगावमध्ये बंद घर फोडून दीड लाखाचा ऐवज लंपास

शिवाजीनगरमधील घटना; दोन संशयित ताब्यात पिंपळगाव बसवंत : प्रतिनिधी शिवाजीनगर परिसरात बंद घराचे कुलूप व…

12 hours ago

येवल्यात स्वामी समर्थ केंद्रात चोरट्यांचा डल्ला

भाविकांत संताप; दानपेटीतील रोकड अन् सीसीटीव्ही डीव्हीआर लंपास येवला : प्रतिनिधी शहरातील पारेगाव रोड परिसरातील…

12 hours ago