दोन दिवसांत नर-मादी जेरबंद; परिसरात अजून तीन बछड्यांचा वावर
सिन्नर : प्रतिनिधी
गुळवंच-मुसळगाव शिवारातील सिन्नर थर्मल पॉवर प्रकल्पाच्या आवारात बिबट्यांच्या वावरामुळे खळबळ उडाली आहे. वन विभागाने लावलेल्या पिंजर्यात मंगळवारी (दि.31) रात्री मादी बिबट्या जेरबंद झाल्यानंतर तिच्या गंधामुळे आकर्षित होऊन गुरुवारी (दि.2) पहाटे नर बिबट्याही पिंजर्यात अडकला. मात्र, परिसरात अजूनही तीन बछड्यांचा वावर असल्याने वन विभागाने शोधमोहीम सुरू ठेवली आहे.
सिन्नर थर्मल पॉवर प्रकल्पाच्या परिसरात मागील आठवडाभरापासून बिबट्यांच्या हालचाली दिसत होत्या. एका मादीसोबत तीन बछडे मुक्तपणे फिरत असल्याचे कंपनीतील कर्मचार्यांनी पाहिले होते. त्यामुळे प्रकल्पावर काम करणारे कर्मचारी व सुरक्षारक्षकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. कंपनी व्यवस्थापनाच्या सूचनेनंतर वन विभागाने 31 मार्च रोजी सायंकाळी प्रकल्पाच्या आवारात पिंजरा लावला होता. या पिंजर्यात मंगळवारी रात्री सुमारे 11.45 वाजता मादी बिबट्या जेरबंद झाली. तिच्यासोबत साधारण दीड वर्ष वयाचे तीन बछडे असल्याची माहिती मिळाल्याने वन विभागाने पकडलेली मादी दुसर्या पिंजर्यात हलवून आधीचा पिंजरा पुन्हा त्याच ठिकाणी ठेवला. मादीचा गंध शोधत बछडे पिंजर्यात अडकतील, या उद्देशाने ही युक्ती करण्यात आली. बुधवारचा पूर्ण दिवस उलटूनही बछडे पिंजर्याकडे फिरकले नाहीत. मात्र, गुरुवारी पहाटे पाचच्या सुमारास पिंजर्यात एक बिबट्या अडकल्याचे कंपनीतील सुरक्षारक्षकांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ वन विभागाला माहिती दिली. वनपरिक्षेत्र अधिकारी हर्षल पारेकर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने घटनास्थळी धाव घेत पिंजर्यातील बिबट्याचा ताबा घेतला असता तो सुमारे पाच वर्षांचा पूर्ण वाढ झालेला नर असल्याचे स्पष्ट झाले. यापूर्वी जेरबंद झालेली मादी सुमारे साडेचार वर्षांची असल्याचे वन विभागाने सांगितले. ही कारवाई वनसंरक्षक कल्पना वाघेरे व वनपरिक्षेत्र अधिकारी हर्षल पारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वनपाल, वनरक्षक तसेच वन्यजीव पथकातील रोहित लोणारे, निखिल वैद्य व अन्य वनकर्मचार्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. जेरबंद केलेल्या बिबट्यांना सिन्नर येथील मोहदरी वनोद्यानात ठेवण्यात आले आहे. या कारवाईत कंपनीचे व्यवस्थापक येलगुंडे व सुरक्षा व्यवस्थापक दुबे यांचेही सहकार्य लाभले. दरम्यान, प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार परिसरात अजूनही तीन बछड्यांचा वावर असल्याने वन विभागाने त्याच ठिकाणी आणखी दोन पिंजरे लावले आहेत.
Leopards swarm at Sinnar Thermal Power Project
सिडको : प्रतिनिधी अंबड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महालक्ष्मी नगर परिसरात जुन्या वादातून एका युवकाचा…
आयपीएल अर्थात, इंडियन प्रीमियर लीगचे हे एकोणिसावे वर्ष आहे. सलग एकोणीस वर्षे आपली लोकप्रियता टिकवून…
चार वर्षांपूर्वी म्हणजे 24 फेब्रुवारी 2022 रोजी रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाले. या युद्धाचा परिणाम जगावर…
पालकांना पसंतीच्या दुकानांतून खरेदीची मुभा; शिक्षण विभागाचे परिपत्रक सिन्नर : प्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या गणवेश, वह्या-पुस्तके तसेच…
‘आयपीएल’च्या धर्तीवर खेळाडूंचा लिलाव; 16 संघांमध्ये रंगणार टेनिस बॉल डे-नाईट स्पर्धा सिन्नर : प्रतिनिधी सिन्नर…
उपजिल्हा रुग्णालयातील प्रकार कळवण : प्रतिनिधी प्रसूतीसाठी कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या मातेचा प्रसूतीनंतर काही…