नाशिक

अवकाळीचा कहर; कांदा, गहू, हरभरा पिकांचे मोठे नुकसान

सिन्नर तालुक्यात वादळी वार्‍यासह विजांचा कडकडाट; सोमठाणे परिसरात सुमारे 400 हेक्टर कांदा बाधित

सिन्नर : प्रतिनिधी
तालुक्यात गुरुवारी (दि.2) दुपारी वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पिकांना मोठा फटका बसला. काढणीच्या अंतिम टप्प्यात असलेल्या गहू, हरभरा आणि उन्हाळी कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेतात काढून ठेवलेला कांदा पावसात भिजल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. दरम्यान, संध्याकाळी उशिरापर्यंत तालुक्याच्या बहुतेक भागांत पावसाची रिमझिम सुरू होती.

सिन्नर शहरात दुपारी दोनच्या सुमारास पावसाने जोर धरला. तालुक्याच्या पूर्वपट्ट्यातील वावी परिसरात वादळी वार्‍यासह विजांचा कडकडाट झाला. पाथरे, पांगरी, रामपूर, उजनी, घोटेवाडी, वल्हेवाडी, निर्‍हाळे, चास, गोंदे आदी भागांतही अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी वार्‍याच्या झोतामुळे पिके आडवी पडल्याचे चित्र दिसून आले.
कहांडळवाडी येथे रवी कहांडळ यांच्या शेडवर विजेचा खांब कोसळल्याची घटना घडली. मात्र, सुदैवाने जीवितहानी टळली. शहा व पंचाळे परिसरात गारपीटही झाल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या आठवड्यातील गारपिटीने झोडपलेल्या सोमठाणे परिसराला गुरुवारी पुन्हा अवकाळीचा फटका बसला. या भागात सुमारे 400 हेक्टरवरील कांदा तसेच सुमारे 50 हेक्टरवरील डाळिंबबागांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. प्रभाकर श्रीपत कोकाटे, राजेंद्र त्र्यंबक कोकाटे, नितीन पोपटराव कोकाटे, मधुकर सूर्यभान धोक्रट, त्र्यंबक रंगनाथ कोकाटे, कचेश्वर काळू कोकाटे, बाबासाहेब गोपीनाथ पदाडे, दिनकर तुकाराम कोकाटे, विजय रामहरी कोकाटे, प्रमोद कारभारी कदम आदी सोमठाणे येथील शेतकर्‍यांच्या पिकांना मोठा फटका बसल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सीमंतिनी कोकाटे यांनी तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांची भेट घेऊन नुकसानीचे गांभीर्य लक्षात आणून दिले. महसूल व कृषी विभागाने तातडीने बाधित भागाची पाहणी करून पंचनामे करावेत आणि शेतकर्‍यांना मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
पंचनाम्याचे आदेश
तालुक्यात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाल्याने आमदार माणिकराव कोकाटे यांनी महसूल व कृषी विभागाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. तहसीलदार सुरेंद्र देशमुख आणि तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर नाठे यांना याबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.
चास येथील श्री बालाजी मंदिरावर वादळी पावसादरम्यान वीज कोसळली. या घटनेत मंदिराचा कळस व लोखंडी बॅक्रेट वाकल्याचे दिसून आले. मात्र, मंदिराच्या मुख्य बांधकामाचे मोठे नुकसान झाले नाही. या घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते बंडूनाना भाबड यांनी दिली.

Unseasonal weather wreaks havoc; Major damage to onion, wheat, gram crops

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

जुन्या वादातून युवकाचा कोयत्याने खून…या भागात घडली घटना

सिडको : प्रतिनिधी अंबड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महालक्ष्मी नगर परिसरात जुन्या वादातून एका युवकाचा…

15 hours ago

सोशल मीडियावरही ’आयपीएल’चा फीव्हर; हिताचे रक्षण व्हायला हवे!

आयपीएल अर्थात, इंडियन प्रीमियर लीगचे हे एकोणिसावे वर्ष आहे. सलग एकोणीस वर्षे आपली लोकप्रियता टिकवून…

2 days ago

मान्सून अंदाज चिंताजनक

चार वर्षांपूर्वी म्हणजे 24 फेब्रुवारी 2022 रोजी रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाले. या युद्धाचा परिणाम जगावर…

2 days ago

गणवेश-साहित्य खरेदीत शाळांच्या सक्तीला लगाम!

पालकांना पसंतीच्या दुकानांतून खरेदीची मुभा; शिक्षण विभागाचे परिपत्रक सिन्नर : प्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या गणवेश, वह्या-पुस्तके तसेच…

2 days ago

सिन्नरमध्ये आजपासून क्रिकेटचा महासंग्राम

‘आयपीएल’च्या धर्तीवर खेळाडूंचा लिलाव; 16 संघांमध्ये रंगणार टेनिस बॉल डे-नाईट स्पर्धा सिन्नर : प्रतिनिधी सिन्नर…

2 days ago

कळवणला प्रसूतीनंतर काही तासांत मातेचा मृत्यू

उपजिल्हा रुग्णालयातील प्रकार कळवण : प्रतिनिधी प्रसूतीसाठी कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या मातेचा प्रसूतीनंतर काही…

2 days ago