परभणी : प्रतिनिधी
नैसर्गिक संकट आणि दुष्काळाच्या सावटात सापडलेल्या राज्यातील बळीराजाला तसेच लाडक्या बहिणींना सरकार कधीही वार्यावर सोडणार नाही. संकटात सापडलेल्या शेतकर्यांना आधार देण्यासाठी शासन कोणतीही कसर सोडणार नाही. बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही. शेतकर्यांची सक्तीची कर्जवसुली तातडीने थांबवून त्यांच्या कर्जाचे पुनर्गठन केले जाईल, अशी महत्त्वपूर्ण ग्वाही उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी दिली.
परभणी येथील ऐतिहासिक गांधी पार्क मैदानावर आयोजित शिवसेनेच्या भव्य मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी शेतकर्यांना दिलासा देताना चारा छावण्या आणि पाण्याचे योग्य नियोजन करण्याचे आश्वासन दिले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ’80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण’ या विचाराचा संदर्भ देत उपमुख्यमंत्री म्हणाले, की राजकारण करण्यासाठी इतर व्यासपीठे उपलब्ध आहेत. मात्र, दुष्काळाच्या या कसोटीच्या काळात शिवसेना राजकारण बाजूला ठेवून 80 टक्के नव्हे, तर 100 टक्के समाजकारण करेल. बळीराजाने कोणत्याही परिस्थितीत खचून जाऊ नये किंवा हार मानू नये. शासन खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे आहे. सर्व राजकीय पक्षांनी मतभेद विसरून शेतकर्यांना सावरण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहनही ’सेवा से समर्पण’ या गौरव यात्रेचे आयोजन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक सेवेतील 25 वर्षांच्या कार्यकाळानिमित्त शिवसेनेच्या वतीने राज्यभरात ’सेवा से समर्पण’ या गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेचा शुभारंभ परभणीतून करण्यात आला. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते गरजू शेतकर्यांच्या मुला-मुलींना 2,500 सायकली आणि लाडक्या बहिणींना स्वावलंबनासाठी 2,500 शिलाई मशिनचे थेट वाटप करण्यात आले. या गौरव यात्रेंंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात 25 हजार सायकली, 25 हजार शिलाई मशिन, शेतकर्यांना आनंदाचा शिधा, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, तसेच सर्वधर्मीय सामुदायिक विवाहांचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
Loan recovery from farmers will be halted and loans will be restructured: Deputy Chief Minister Eknath Shinde.