फडणवीसांची अमित शहा यांच्याकडे मागणी, राज्यात भीषण दुष्काळ
नवी दिल्ली :
राज्यात प्रचंड दुष्काळ आहे. पिण्याच्या पाण्याची समस्यादेखील तयार होणार आहे. चार्याची समस्यादेखील तयार होणार आहे. जवळपास 32 जिल्ह्यांमध्ये मोठ्या आणि आपण विचार केला तर 80 टक्के तालुके हे दुष्काळाने पूर्णपणे प्रभावित पाहायला मिळतात. केंद्र सरकारने राज्याला विशेष मदत करावी. आम्ही जो प्रस्ताव पाठवतोय त्या संदर्भात तत्काळ केंद्राची टीम यावी, अशा प्रकारची विनंती केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मुख्यमंत्री फडणवीस बुधवारी दिल्ली दौर्यावर होते. त्यांनी राज्यातील दुष्काळाबाबत जो काही प्रस्ताव पाठवला आहे त्याची माहिती देण्यासाठी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. प्रस्तावाची प्रतदेखील शहा यांना दिली. माझी दुसरी बैठक केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत झाली आहे. या बैठकीचा उद्देश विशेषत: जे नागपूर विमानतळ तयार करत आहोत, त्यामध्ये आपल्याला नवीन टर्मिनल बिल्डिंग करायची आहे. त्याठिकाणी 27 एकर जागा ही एअरफोर्सकडे आहे. त्या ठिकाणाहून त्यांचे काम चालते. ती जागा तत्काळ आपल्याला मिळावी, जेणेकरून हे काम आपल्याला वेगात पूर्ण करता येईल. यादृष्टीने त्यांच्यासोबत आजच केंद्राची टीम पाहणीसाठी येणार केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासोबत चर्चा झाली होती. ही टीम 8 तारखेपासून राज्यात येईल, असे आम्हाला सांगण्यात आले आहे. 8 पासून 11 तारखेपर्यंत ही टीम राज्यातील विविध भागांची पाहणी करून दुष्काळाची परिस्थिती काय आहे, याची तपासणी करेल. त्यानंतर ही टीम आपला रिपोर्ट एनडीआरएफला सादर करेल. त्यांचा रिपोर्ट आणि पाठवलेला प्रस्ताव या आधारावर एनडीआरएफ त्यासंदर्भात निर्णय घेईल. त्यादृष्टीने अत्यंत वेगाने हे सर्व निर्णय होत आहेत, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
केंद्रीय गृहमंत्र्यांनी सकारात्मकता
मी विशेष विनंती केली आहे की, एकूण सर्व दुष्काळाची परिस्थिती पाहता विशेष मदत केंद्र सरकारने आम्हाला करावी. केंद्रीय गृहमंत्र्यांनी सकारात्मकता दाखवली आहे. नियमात बसून जी जास्तीत जास्त मदत करता येईल ती मदत केंद्र सरकार करेल, अशा पद्धतीचे आश्वासन त्यांनी दिले आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
The Central Government should provide special assistance to Maharashtra.