धार्मिक विधीच्या नावाखाली पती-पत्नी बनून आले अन…
त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
नाशिक येथील एका प्रेमीयुगुलाने त्र्यंबकेश्वर येथील लॉजमध्ये विषारी औषध सेवन करुन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्र्यंबकेश्वर येथील प्रितम लॉजमध्ये नाशिक येथील तानाजी रामराव चौधरी (40, राहणार गांधी नगर ) आणि रूपाली महेश जाधव (35, राहणार जाधव संकुल सातपूर) यांनी आपण पती-पत्नी असल्याचे सांगत त्र्यंबकेश्वर मंदिराच्या समोरच असलेल्या लॉज येथे रुम घेतली होती. बुधवारी रात्री आठच्या सुमारास ते मुक्कामी आले होते. धार्मिक विधी करण्यासाठी आलो असल्याचे सांगितले. तानाजी चौधरी याने आपले आधार कार्ड आणि पॅन कार्ड ओळख म्हणून सादर केले.तशी रजिस्टरमध्ये नोंद केली. मात्र रात्री 1 ते 2 वाजेच्या दरम्यान महिलेला उलटया होत आहेत म्हणून ती बाहेर आली.त्यानंतर तेथे काम करणा-या रूम बॉयला संशय आल्याने त्याने खोलीमध्ये डोकावून पाहिले असता तेथे किटनाशक तसेच पिण्याच्या पाण्याच्या दोन छोटया बाटल्या,मद्याची बाटली दिसून आली. त्याने आपल्या सहका-यांच्या मदतीने दोघांना त्र्यंबकेश्वरच्या उपजिल्हा रुग्णालयात हलवले. तेथील वैद्यकीय अधिका-यांनी प्रथमोपचार केले मात्र त्यांची अवस्था पाहून तातडीने जिल्हा रूग्णालयात पाठवले. तेथे सकाळी 6.30 वाजता तानाजी चौधरी हा मृत झाला तर रूपाली जाधव हिची दुपारी 4.30 वाजता प्राणज्योत मालवली.त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात शुक्रवारी याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस या घटनेच्या मागे असलेल्या कारणांचा शोध घेत आहेत.
मालेगाव बॉम्बस्फोटातील पीडित परिवार जाणार सुप्रीम कोर्टात मनमाड : आमिन शेख गेल्या सतरा वर्षांपासून न्यायच्या…
नाशिक: प्रतिनिधी संपूर्ण राज्यात गाजलेल्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल आज जाहीर करण्यात आला. न्या, ए…
नाशिक:प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची, जालना येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात…
भिकाऱ्याकडे साडेसात कोटींची संपत्ती! मुंबईत दोन मोठे फ्लॅट, ठाण्यात दुकानांसह बरंच काही शहापूर : साजिद…
भारतीय परंपरेतील प्रत्येकाच्या जीवनातील एक महत्त्वाचा संस्कार आहे विवाह. हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचे वळणच…
श्रावणमास सुरू होतो तसे निसर्गात आल्हाददायक बदल घडू लागतात. आभाळात पांढर्याशुभ्र पिंजलेल्या कापसाची नक्षी उमटू…