नाशिक

मालगाडीच्या धडकेत मॅजिक कारचा चक्काचूर

रेल्वे क्रॉसिंग गेटवर अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

मनमाड : प्रतिनिधी
मनमाड शहरातील गर्डरशॉप भागात गुरुवारी सकाळी भीषण अपघात घडला. एफसीआयच्या गोदामाकडे धान्य घेऊन जाणार्‍या रेल्वे मालगाडीने रुळावर बंद पडलेल्या काळी-पिवळी मॅजिक गाडीला जोरदार धडक दिली. या धडकेत मॅजिक कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला असून, सुदैवाने गाडीतील प्रवासी वेळीच बाहेर पडल्याने
अनर्थ टळला.
शहराच्या मध्यभागी असलेल्या भारतीय अन्न महामंडळाच्या (एफसीआय) गोदामात रेल्वेने धान्याचा पुरवठा केला जातो. या रेल्वे रुळाच्या दोन्ही बाजूंना दाट लोकवस्ती असल्याने नागरिकांना आणि वाहनांना ये-जा करण्यासाठी हा रूळ ओलांडून जावे लागते. गुरुवारी सकाळी मॅजिक कार या अनधिकृत क्रॉसिंगवरून जात असताना अचानक रुळावरच बंद पडली. त्याच वेळी समोरून मालगाडी येत असल्याचे चालकाच्या निदर्शनास आले. मालगाडी जवळ येत असल्याचे पाहून मॅजिकमधील सर्व प्रवासी तातडीने खाली उतरले आणि दूर पळाले. काही क्षणांतच भरधाव मालगाडीने मॅजिकला भीषण धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, मॅजिक कार लांब फेकली जाऊन तिचा पूर्णतः चक्काचूर झाला. प्रवाशांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे या घटनेत कोणालाही इजा झाली नाही. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, स्थानिक नागरिकांनी रेल्वे प्रशासनाकडे या ठिकाणी अधिकृत गेट (फाटक) बसवण्याची मागणी केली आहे. रेल्वे प्रशासनाने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

रेल्वेने क्रॉसिंग गेट लावण्याची मागणी…!

मनमाड शहरातील एफसीआयकडे जाणारा रेल्वेमार्ग आहे, हा मार्ग शहराच्या मध्य भागातून जातो. याशिवाय, हा रस्ता शहरानजीक असलेल्या ग्रामीण भागालादेखील जोडला जातो. या रस्त्याने ग्रामीण भागातील नागरिक व शालेय विद्यार्थीदेखील ये-जा करतात. त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. रेल्वेच्या मालवाहतूक करणार्‍या गाड्या जातात. त्यामुळे या ठिकाणी रेल्वेने क्रॉसिंग गेट लावावा, अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडून करण्यात येत आहे.

Magic car smashed in freight train collision

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

3 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

3 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

3 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

3 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

4 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

4 hours ago