नाशिक

खरात प्रकरणाची निःपक्ष चौकशी करा महिला काँग्रेस अध्यक्षा मुळाणेंची मागणी

सिडको : विशेष प्रतिनिधी
महिलांवर अत्याचार केल्याच्या आरोपांमध्ये अडकलेल्या अशोक खरात याची कोणत्याही राजकीय दबावाविना निःपक्ष चौकशी करण्यात यावी आणि पीडित महिलांना तात्काळ न्याय मिळावा, अशी मागणी नाशिक जिल्हा ग्रामीण महिला काँग्रेसच्या अध्यक्षा वनिता मुळाणे यांनी केली.
अशोक खरात उर्फ कॅप्टन याने अनेक महिलांवर अत्याचार करून त्यांना ब्लॅकमेल केल्याचा आरोप असून, ही गंभीर आणि निषेधार्ह बाब असल्याचे मुळाणे यांनी नमूद केले. अशा प्रवृत्तीवर कठोर कारवाई होणे आवश्यक असून संबंधित आरोपीस त्वरित शिक्षा व्हावी, असेही त्यांनी
सांगितले.
या मागणीसाठी नाशिक जिल्हा ग्रामीण महिला काँग्रेसच्या वतीने अंजनेरी-त्र्यंबकेश्वर येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी वनिता मुळाणे बोलत होत्या. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांत महिलांवरील गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीवरील सिड हल्ला, तसेच एका स्वयंघोषित कीर्तनकाराकडून झालेल्या अत्याचाराच्या घटना यामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. अशोक खरात प्रकरणामुळेही अनेक महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचा आरोप त्यांनी केला.
वनिता मुळाणे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात ‘अशोक खरातला शिक्षा द्या’, ‘महिलांना न्याय मिळालाच पाहिजे’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
या प्रकरणासंदर्भात लवकरच पुण्यातील तपास अधिकारी तेजस्विनी सातपुते यांची भेट घेऊन महिला काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात येणार असल्याची माहितीही मुळाणे यांनी दिली.
या आंदोलनात सुनीता चव्हाण, मंगला शिंदे, शाहीन शेख, माया चव्हाण, अनिता काळे, संजना भालके, सविता चव्हाण, मंगला रुपवते, नीलिमा पाटील, साजिया शेख, संतोष शिंदे, अशोक चव्हाण, नारायण भगत, लाला घुले आदींसह काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Mahila Congress President Mulane demands an impartial inquiry into the Kharat case

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

2 days ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

2 days ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

2 days ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

2 days ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

2 days ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

2 days ago