नाशिक

पुजारी, कर्मचारी व फार्महाउस वॉचमनची झाडाझडती

सिन्नर : प्रतिनिधी
बलात्कार प्रकरणातील आरोपी अशोक खरात याच्या प्रकरणाचा तपास आता वेगाने पुढे सरकत असून, विशेष तपास पथकाने (एसआयटी) त्याच्या निकटवर्तीयांना चौकशीच्या कक्षेत घेतले आहे. मिरगाव येथील ईशान्येश्वर मंदिराचा पुजारी, मंदिरातील साफसफाई व देखभाल करणारा कर्मचारी तसेच फार्महाउसचा वॉचमन यांना चौकशीसाठी नाशिक येथे बोलावण्यात आले होते.
रविवारी सकाळी या तिघांना एसआयटी कार्यालयात उपस्थित राहण्याचा निरोप देण्यात आला. त्यानुसार मंदिराचा उत्तर भारतीय पुजारी तिवारी, मंदिरातील कर्मचारी प्रमोद गडाख आणि फार्महाउसचा वॉचमन हे तिघेही चौकशीसाठी नाशिककडे रवाना झाले होते. नाशिकला जाण्यापूर्वी त्यांनी वावी पोलिस ठाण्यात जाऊन आपल्याला एसआयटीकडून चौकशीसाठी बोलावण्यात आल्याची माहिती अधिकार्‍यांना दिल्याचे सांगितले जाते. ईशान्येश्वर मंदिर आणि कॅप्टनचे फार्महाउस हे एकाच परिसरात असून, या ठिकाणी अर्धा किलोमीटर परिसरात इतर कोणतीही वस्ती नसल्याचे सांगितले जाते. उत्सवाचे काही दिवस वगळता मंदिर परिसरात सहसा शांतता असते. त्यामुळे मंदिरात दर्शनासाठी कोण येत-जात होते, कॅप्टन मुक्कामी असताना कोणाची वर्दळ असायची तसेच मंदिरात नेमके कोणते पूजाविधी होत होते, याबाबत माहिती घेण्यासाठी एसआयटीकडून संबंधितांची चौकशी केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, खास वाराणसी येथून ईशान्येश्वर मंदिरात रोजच्या पूजेसाठी आणलेल्या पुजार्‍याचे खरात याच्याशी खटके उडाल्यामुळे तो येथून तीन वर्षांपूर्वीच निघून गेल्याचे समजते. त्यामुळे हा पुजारी नेमका का निघून गेला, याविषयी आता शंका कुशंका उपस्थित केल्या जात आहेत.

Priest, staff and farmhouse watchman’s tree-sweeping

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

2 days ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

2 days ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

2 days ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

2 days ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

2 days ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

2 days ago