नाशिक

अहिल्यानगरमधील घटनेच्या चौकशीसाठी महिला काँग्रेसचे निवेदन

सिडको : विशेष प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्ह्यात घडलेल्या तीन वेगवेगळ्या गंभीर घटनांमुळे समाजात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने प्रशासनाकडे निवेदन सादर करण्यात आले. संबंधित सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करून पीडितांना न्याय द्यावा, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
नाशिक जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा वनिता राजेश ढेरिंगे यांच्या नेतृत्वाखाली शाहीन शेख, सुमन राठोड, चंचल अहिरे, हेमांगी सावंत, पूजा म्हस्के व सरला अडांगळे यांनी नायब तहसीलदार प्रियांका पाचरणे यांची भेट घेऊन हे निवेदन दिले.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे मंदिराशी संबंधित एका व्यक्तीकडून महिलांचे शोषण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. संबंधित व्यक्तीने राजकीय ओळखीचा गैरफायदा घेतल्याचेही नमूद करण्यात आले. ही घटना उशिरा समोर आल्याने संताप व्यक्त करण्यात आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर अज्ञाताकडून अ‍ॅसिड हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणातील आरोपी अद्याप फरार आहे. या घटनेमुळे विद्यार्थी व पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पारनेर तालुक्यातील टाकळीपूर परिसरात ज्योतिषाच्या नावाखाली एका वारकरी संस्थेशी संबंधित व्यक्तीकडून अल्पवयीन मुलीचे दीर्घकाळ लैंगिक शोषण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडितेच्या कुटुंबाच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत धमकावून हे प्रकार सुरू ठेवण्यात आल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
वरील तिन्ही घटनांचा उल्लेख करत सर्व प्रकरणांची निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच पीडितांना तत्काळ न्याय मिळवून द्यावा, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
महिलांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याची गरजही व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, या प्रकरणांमध्ये योग्य ती कारवाई न झाल्यास नाशिक जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

Mahila Congress’s statement for an inquiry into the incident in Ahilyanagar

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

3 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

3 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

3 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

3 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

4 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

4 hours ago