चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस विरुद्ध दिशेला घुसली
पंचवटी: प्रतिनिधी
शहरात सिटीलिंक बसच्या वेगाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. म्हसरूळ परिसरातील किशोर सूर्यवंशी मार्गावर बुधवारी (दि. 18) दुपारी एका भरधाव सिटीलिंक बसने सायकलवरून जाणार्या दोन तरुणांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात संकेत नागोजी गवळी या मुलाचा मृत्यू झाला, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागोजी सखाराम गवळी (वय 51, रा. श्रीजी हाइट्स, जुईनगर) यांचा मुलगा संकेत आणि त्याचा मित्र आर्यन संदीप वाघमारे हे दोघे बुधवारी दुपारी 2.15 च्या सुमारास सायकलने किशोर सूर्यवंशी मार्गावरून जात होते. समर्थ मेडिकलसमोरून जात असताना कनसरा चौकाकडून ओमकार चौकाकडे अतिवेगाने येणार्या सिटीलिंक बसच्या (एमएच 15-जीव्ही 7944) चालकाचे नियंत्रण सुटले. ही बस इतक्या वेगात होती की, चालकाने ती थेट विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये घातली. समोरून येणार्या संकेत आणि आर्यन यांच्या सायकलला बसने भीषण धडक दिली. या धडकेत संकेतच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. आर्यन वाघमारे गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
धडक दिल्यानंतर बसने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका झायलो गाडीलाही धडक दिली. त्यात गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघाताची भीषणता पाहून परिसरात खळबळ उडाली. मात्र, अपघात घडल्यानंतर बसचालक मदतीसाठी न थांबता घटनास्थळावरून पसार झाला. म्हसरूळ पोलिसांनी याप्रकरणी बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक एस. एस. मद्रुपकर पुढील तपास करत आहेत.
Speeding Citylink bus crushes cyclists, one killed
पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…
तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…
ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…
अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…
महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…
विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…