मामूट्टी, कार्तिक आर्यन ’सर्वोत्कृष्ट अभिनेता’

अनंत नाग यांना ’दादासाहेब फाळके पुरस्कार’

केवडिया : विशेष प्रतिनिधी
गुजरातमधील केवडिया येथे पार पडलेल्या 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना त्यांच्या दशकानुदशकांच्या अतुलनीय योगदानासाठी भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च असा 2024 चा ’दादासाहेब फाळके पुरस्कार’ प्रदान करून गौरवण्यात आले. अभिनयाच्या मुख्य श्रेणीत बॉलीवूड कलाकारांनी लक्ष वेधून घेतले.
’चंदू चॅम्पियन’ चित्रपटातील उत्कृष्ट भूमिकेसाठी कार्तिक आर्यनला त्याच्या कारकिर्दीतील पहिला ’सर्वोत्कृष्ट अभिनेता’ हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार दाक्षिणात्य सुपरस्टार मामूट्टी यांच्यासोबत विभागून देण्यात आला आहे. तसेच ’आर्टिकल 370’ चित्रपटातील दमदार अभिनयासाठी यामी गौतमला ’सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’चा पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असून, याच ’आर्टिकल 370’ने ’सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म’चा बहुमानही पटकावला आहे. याव्यतिरिक्त ’सर्वोत्कृष्ट दिग्दर्शका’चा पुरस्कार आनंद एल. राय यांना, तर ’सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता’ म्हणून संजय मिश्रा यांना सन्मानित करण्यात आले.
यंदाचा 72 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा (2024) नवी दिल्लीतील विज्ञान भवनऐवजी प्रथमच गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यातील एकतानगर (केवडिया) येथे ’स्टॅच्यू ऑफ युनिटी’च्या सान्निध्यात पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते भारतीय चित्रपटसृष्टीत उत्कृष्ट प्रगती आणि योगदान देणार्‍या कलाकारांना तसेच तंत्रज्ञांना या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात
आले.
’मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’ चित्रपटाने ’सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट’ हा मानाचा पुरस्कार पटकावला. यासोबतच ’हमसफर’ हा सर्वोत्कृष्ट लघुपट ठरला. ’भंगार’ (मराठी-इंग्रजी) या चित्रपटाला ’सर्वोत्कृष्ट नॉन-फीचर फिल्म’चा पुरस्कार मिळाला आहे. इतर प्रमुख विजेत्यांमध्ये ’श्रीकांत’ , ’मारण’ आणि ’रायन’
(सर्वोत्कृष्ट तामीळ चित्रपट) यांचा समावेश आहे.

Mammootty, Karthik Aaryan ‘Best Actor’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *