– योगिनी पैठणकर
सध्या जिथेतिथे जेन-झीची चर्चा सुरू आहे. दोन्ही बाजूंचे मतप्रवाह चोहोंकडून ऐकू येताहेत. हल्लीची मुलं तशीच, अशीच, हल्ली मुलं कोणाचंही ऐकून घेत नाहीत, आपलंच चालवतात नि हे सगळं टीव्हीवर-आंदोलन- नावाखाली खूप गाजतंय. सोशल माध्यमानेही हा मुद्दा उचलून धरलाय- एक झुरळ शब्द काय आला नि ही तरुण 18 ते 25 वयोगटातील मुलं, मिसरूड न फुटलेली मुलं पेटून उठली. त्यांची चर्चा सर्वदूर पसरली नि हे लोण भारतभर झालं. त्याला कारण काय, हे सगळे जाणतातच! धर्म, जाती, लिंग, भाषा या पलीकडे जाऊन सर्वसमावेशक, सुशिक्षित व फारशी संवेदनशील नसलेली ही युवा पिढी. म्हणजेच जेन-झी सगळ्या समाजाचे प्रतिनिधित्व करत आहे. सरकारविरोधी भाष्य करत आहे व तेही मोठ्या प्रमाणात! लोकशाहीमध्ये सरकार या आंदोलकांना काय उत्तर देणार यावर चर्चा चालू असतानाच एक राजीनामा काहीही करायला भाग पाडतो हा जेन-झीचा विजयच म्हणायला हवा.!..
दिल्लीमध्ये कुठली तरी सीजेपी पार्टी काही ठोस मुद्यांंसह एकत्रित येते, आपले प्रश्न त्यांच्या पद्धतीने, गाण्यांनी, मीम्सने, अँगलने मांडते नि त्यांच्यावर लाठीमार होतो. मी कुठलाही पक्ष बरोबर किंवा चूक हा मुद्दा मांडणार नाहीये पण माझ्यासारख्या पन्नाशीतल्या आईला व नागरिकाला खूप विचार पडतो. मीही याच समाजाचा भाग आहे, नोकरी, बेरोजगारी, आत्महय्या, काटकसर आम्हीही जवळून पाहिली आहे. आजही हॉटेलवर खूप पैसे गेलेत की जीव हळहळतो. पण ही मुलं त्याच प्रश्नांसाठी एकत्र येतात, तेव्हा बरे वाटते. याची दूसरी बाजूही आहे की हीच पिढी व्यसनाधीनता, चोरी, लूटमार, जातपात, सरकारविरोधात काहीबाही बोलणे, दगडफेक करते त्याने मात्र मन विषण्णही होते. याच पिढीतील लाडके वाक्य मग ऐकू येते….अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र/देश माझा?
सन 2011 मध्येे अण्णा हजारेंनतर एवढा मोठा मोर्चा आपण तरी आताच बघतोय. जरांगे पाटील यांचं उपोषण….चर्चेचा विषय होता, हळूहळू विसरले लोकं. काहींना वाटतं ही जेन-झी अहंकारी आहे, इन्स्टंट आहे, असेलही. कारण त्यांनी जन्मतः च मोबाईल स्क्रीनवर, गुगलवर सगळं रेडिमेडच पाह्यलंय. ना कधी काही कष्ट घेतले, ना कधी काही श्रम केलेत. वडीलांनी जे जमून नी जपून ठेवले त्यावरच यांचं चाललंय. काही लोकं हे मानतातही की ते हूशार आहेत पण तितकेच आळशीही आहेत. यांना भाज्यातला, डाळीतला साधा फरकही कळत नाही. या मुलांनी कधी नाही शब्द ऐकलाच नाही, एकुलते एक असल्याने सगळं आपलंच व माझ्यासाठीच ही भावना दृढ होत गेली. घरी पालक ऐकतात, शाळेत शिक्षक ऐकतात. ओरडत नाही, मार नाही, धाक नाही, फार मित्र नाही, संवेदना नाही मग जे करू तेच बरोबर असं त्यांचं वर्तन होणारच यात शंका नाहीच.
त्यातनं र्सीेीपव षश्रेेी वर काम केलंच नाही कधी, सतत ऑनलाइन, बैठे काम, कोणाशी फेस टू फेस संभाषण नाही, मदत नाही. फक्त इन्स्टा, सोशल मीडिया, ट्विटरवर जग बघतात व तशीच मतं करून घेतात. जर त्यांना तेच खरं वाटतंय तर ते आपलं म्हणणं ते का ऐकतील? हाही प्रश्न खरंच
मोठा आहेच.
आपण आपल्या पालकांना घाबरायचो, असं वागलं तर काय म्हणतील, समाज काय करेल? आई-वडील मारतील, ही भूमिका होती! हल्लीच्या पिढीला तशी काही भीती वाटत नाही, एकतर सगळं इंटरनेटवर असतं आणि तेच त्यांना खरं वाटत असतं, क्षणाचाही विचार न करता स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व, विचार दाखवणारी ही पिढी आहे, त्यामुळे आपले विचार त्यांना साहजिकच पटत नाही व आपण त्यांच्यापुढे धावू शकत नाही. त्यांनी आपल्यासारखा बँड पॅच बघितलेला नाही. त्यामुळे या जेन-झीचे विचार शक्ती, स्वतंत् राहिलेले नाही आणि क्लिअर मतांची, विचारांची त्यांची संकल्पना आहे! तुमची भाषा कधी कधी टोचणारी वाटते! वेगळी वाटते. त्यांच्या आयुष्यात विचार करण्याची क्षमता नाही! टेक्नॉलॉजी काढून घेतली तर त्यांना काहीच जमणार नाही कारण त्यांचं आयुष्य मुळातच टेक्नोसौवी आहे. पण हे पण…… सत्य नसतं, शाश्वत नसतं.. त्यामुळे आपल्या सारख्यांना वाटते, त्यांना किंमत नाहीये. ही पिढी फक्त सोशल माध्यमांवर जगणारी आहे. आपल्या पिढीसारखी स्थित्यंतर पाहिली नाहीत.इंटरनेटमुळे सगळे कनेक्ट आहेत. पण संवाद नसतो. लाइक्सवर चालणारी ही दुनिया. एका क्लिकवर व फुकटच्या प्रतिक्रियेवर जगणारी, खरं मानणारी ही पिढी. मनात साचलेलं ट्विटरवर बिनधास्त मांडणारी पिढी. आणि मग ीे लरश्रश्रशव आधुनिक समाज त्यात टोळीत घुसतो. या गर्दीला एक चेहरा नसतो. पण त्यांची मनातली भावना तेथे उद्वीग्नतेने मांडली जाते. थोडं अधिक समंजसपणे ही पिढी वागली, बोलली तर शांतपणे हे सगळे प्रश्न सुटतीलही पण त्यांना तो पेशन्स नसतो. सगळं तात्काळ, इन्स्टंट हवं व हवं म्हणजे हवंच. तडजोड नाही., कमीपणा घ्यायचा नाही…. मी स्वतः त्या वयातल्या मुलाची आई आहे. मलाही त्यांच्या भावना कळतात, समजू शकतात, पण आम्हाला ना जूनं सोडवत, ना नवं मानवत, अशी अवस्था. आपल्याला शेवटी त्यांच्याच सोबतीने प्रवास करायचा आहे.
भले पटो, न पटो, स्त्री-पुरुष भेदभाव न दाखवता मनात येईल ते बरळणं, भले अश्लीलता नसेल, पण संस्कारही विसरली नाही, भले त्यांची भाषा ऊद्दाम असेल. न पटणारी असेल, विडंबनात्मक असेल आपल्या जुन्या संस्कृतीला ती अमान्य असणारे…त्यांना कशाचंच अप्रूप, कौतुक, आकर्षण, नवलाई नाही. त्यांना धनसंचय नकोय. लगेच उडवून मोकळे, असाच बदल यापुढे होणारे, अख. ॠेेसश्रश, ीारीीं हिेपश इन्स्टा या माहीतीचा अतिरेक होऊन मग ती पिढीही तशीच झाली ये त्यामूळेच त्यांच्यात बेफिकिरी वाढतेय. भौतिकवाद वाढतोय. याच बाबतीत एक इंग्रजी वाक्य आठवतंय, वेप’ीं ींहीेु लरलू ुळींह लरींह ुरींशी. तसं नं घडो म्हणजे मिळवलं.
शेवटी काय, जगातली सर्वांत मोठी संपत्ती शिक्षण व ज्ञान. त्याचा उपयोग कसा करायचा हे या जेन झीने ठरवायचं आहे. आशेची किरणं पसरवायची की समाजाला निराश करायचं? शेवटी निर्णय सर्वस्वी त्यांचाच आहे. आपल्याला काय वाटतं?
Gen Z and Us
भुसावळ विभागाची आकस्मिक तपासणी; अधिक दर आकारणार्यांवर कारवाई लासलगाव : वार्ताहर रेल्वेस्थानकांवर प्रवाशांना निर्धारित दरात…
397 किलो तूप ताब्यात; नांदगावात 196 लिटर दूध नष्ट नाशिक : प्रतिनिधी अन्न व औषध…
शेतकरी अन् दूधविक्रेत्याच्या वेशात रचला सापळा नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी नाशिकरोड पोलिसांनी एकलहरा रोड भाजीपाला…
दुचाकीस्वार ठार; दोघे गंभीर जखमी दिंडोरी : प्रतिनिधी वणी-सापुतारा रस्त्यावर पांडाणे गावाजवळ सोमवारी (दि. 10)सायंकाळी…
चांदवडच्या मुलींच्या वसतिगृहात बिबट्याचा शिरकाव चांदवड : वार्ताहर येथील ऐतिहासिक कालिकादेवी लेणीच्या पायथ्याशी असलेल्या शासकीय…
महिला साथीदारही अटकेत; उपनगर पोलिसांत गुन्हा नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी फायनान्स कंपनीत डेप्युटी मॅनेजर असल्याची…