नाशिक

मालेगावात खड्डाजीन परिसरात भीषण आग

आठ बंबांच्या सहाय्याने आग आटोक्यात; आठ लाखांचे नुकसान

मालेगाव : प्रतिनिधी
शहरातील खड्डाजीन परिसरात दुपारच्या सुमारास गोदाम परिसरात भीषण आग लागली.
आगीने काही क्षणांतच विक्राळ रूप धारण केले असले, तरी मालेगाव महापालिकेच्या अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करत आठ बंबांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला.
घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, येथील एका ऑइल मिल परिसरात मोकळ्या जागेत साचलेल्या कचर्‍याला आग लागली. सुरुवातीला किरकोळ वाटणारी ही आग काही वेळातच वेगाने पसरत जवळच असलेल्या पाइप गोदामापर्यंत पोहचली. यात पाइपचे तीन मोठे गठ्ठे खाक झाले. यानंतर ही आग जवळच असलेल्या गोठा आणि मक्याच्या कुट्टी चार्‍यापर्यंत पसरली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे चार बंब तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. मात्र, आगीचे वाढते स्वरूप लक्षात घेता आणखी बंब मागवण्यात आले. एकूण आठ अग्निशमन बंबांनी दोन-दोन फेर्‍या मारत अथक प्रयत्न केल्यानंतर अखेर आग पूर्णपणे विझवण्यात यश आले.
या आगीत अंदाजे आठ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. काही प्रमाणात मक्याच्या कुट्टी चार्‍याचेही नुकसान झाले आहे. मात्र, अग्निशमन दलाने वेळेवर केलेल्या कार्यवाहीमुळे इतर पाइप साठा, परिसरातील मालमत्ता आणि सुमारे 15 गायींना सुरक्षित स्थळी हलवण्यात यश आले. त्यामुळे मोठी हानी टळली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ही संपूर्ण बचाव मोहीम अग्निशमन अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
फायरमन शकील, जालिंदर जाधव, रफिक खान, शाहबा, राकेश पगारे, बॉबी आहिरे, अमोल आदींच्या पथकाने धाडसाने काम करत आग नियंत्रणात आणली.

Massive fire breaks out in Khaddajin area of ​​Malegaon

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

अधिक मासातील अधिक विचार

‘वर्षामागूनी वर्ष सरती ऋतू मागूनी ऋतू’ या गाण्याच्या ओळीप्रमाणे ऋतू चक्र फिरत असते. महिने, वर्ष…

13 minutes ago

मरण स्वस्त आणि जगणं महाग

अनेकांना वाटतं की, पेट्रोल-डिझेल महागलं की फक्त स्वतःची गाडी असणार्‍यांनाच फटका बसतो. पण हे अर्थशास्त्र…

32 minutes ago

खरंच!.. काय होते ते दिवस….

बालपण म्हणजे जणू सुंदर स्वप्न. जे जगताना कधी कळत नाही, पण नंतर आठवलं की डोळे…

38 minutes ago

कायद्याच्या बालेकिल्ल्यात रिक्षाचालकांची मुजोरी

पोलिसांचा कानाडोळा; वाहतूक कोंडीत भर नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशी मोहीम शहर…

47 minutes ago

जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्र

109 गावे, 238 वाड्यांना टँकरद्वारे पाणी नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची समस्या अधिक…

56 minutes ago

अवकाळीचा नाशिक विभागाला सर्वाधिक फटका

1.46 लाख शेतकरी बाधित, 145.87 कोटींची मदत मंजूर नाशिक : प्रतिनिधी मार्च 2026 मध्ये झालेल्या…

1 hour ago