राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय

नेपाळमध्ये महापूर; अनेक गावांसह हजारो नागरिक वाहून गेल्याची भीती

46 जणांचा मृत्यू, 105 भारतीय बेपत्ता

काठमांडू/नवी दिल्ली :
नेपाळमध्ये महापुराने विध्वंस झाला आहे. रसुवा जिल्ह्यात भोटेकोशी नदीला आलेल्या महापुरामुळे हजारोंहून अधिक लोक वाहून गेल्याचे वृत्त आहे. तसेच रस्ते, पूल आणि जलविद्युत प्रकल्पांचे मोठे नुकसान झाले आहे. या अचानक आलेल्या आपत्तीमुळे मोठी जीवितहानी झाल्याची भीती प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे. या अचानक आलेल्या पुरामुळे जवळपास 46 जणांचा मृत्यू झाला, तर 105 भारतीयांसह सुमारे पाचशे जण बेपत्ता आहेत. पूरग्रस्त भागांतून आतापर्यंत 46 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, अशी माहिती सुरक्षा अधिकार्‍यांनी दिली.
रसुवा हे जवळपास 50 हजार लोकसंख्या असलेले शहर आहे. सर्वाधिक फटका चीन-नेपाळ सीमावर्ती भागाला बसला आहे. दरम्यान, भोटेकोशी नदीच्या पात्रातील पाण्याची पातळी धोक्याच्या चिन्हावरून वाहत असल्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना तातडीने सुरक्षित आणि उंच ठिकाणी हलण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. अचानक आलेल्या या पुराचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही; परंतु ग्लेशियल लेक आउटबर्स्ट फ्लड किंवा भूस्खलनामुळे नदीचा प्रवाह अडवून अचानक पाणी सोडले गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या संकटाच्या पार्श्वभूमीवर, भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्याशी संवाद साधून बिहारमध्येही सतर्कतेचा इशारा दिला आहे आणि एनडीआरएफच्या तुकड्यांना सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. नेपाळच्या काही भागांत आलेल्या विनाशकारी पुरामुळे, दिल्लीत राहणारे नेपाळी नागरिक आणि कामगार बुधवारी दिवसभर आपल्या कुटुंबीयांशी, मित्रपरिवाराशी संपर्क साधण्यासाठी अस्वस्थपणे प्रयत्न करत होते.मुसळधार पावसामुळे आलेल्या या पुराचा फटका मध्य नेपाळच्या काही भागांना बसला. यात पूल, गावे आणि जलविद्युत प्रकल्पांचे नुकसान झाले असून शेकडो लोक बेपत्ता झालेत. या नैसर्गिक आपत्तीमुळे दिल्लीतील अनेक नेपाळी कामगार आपल्या कुटुंबीयांच्या आणि नातेवाईकांच्या सुरक्षिततेबाबत चिंतेत होते आणि बाधित भागातील लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी नेपाळमधील विनाशकारी पुरामुळं झालेल्या जीवितहानी आणि मालमत्तेच्या नुकसानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आणि नेपाळमध्ये बेपत्ता असलेल्या 100 हून अधिक भारतीय नागरिकांचा शोध घेण्यासाठी भारत सरकारनं तातडीनं पावलं उचलावीत, असं आवाहन केलं. पर्यटन मंडळानं दिलेल्या माहितीनुसार, बेपत्ता असलेल्या 384 पर्यटकांमध्ये 291 परदेशी नागरिक आणि 93 नेपाळी नागरिकांचा समावेश आहे. या परदेशी नागरिकांमध्ये भारतासह युनायटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, मलेशिया, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्स यांसारख्या विविध देशांतील पर्यटकांचा समावेश आहे. ज्यामध्ये केवळ भारतातील 105 पर्यटकांचा समावेश आहे. याचबरोबर, नेपाळ पर्यटन मंडळानं मदतीसाठी टोल-फ्री आपत्कालीन क्रमांक 1234, हॉटलाइन 1144 किंवा पर्यटक पोलीस क्रमांक 9851289445 देखील जारी केला आहे.
ग्लेशियर सरोवर फुटल्याची भीती
रसुवामध्ये गेल्या 24 तासांत 7 मिमी पेक्षा जास्त पाऊस पडलेला नाही, त्यामुळे स्थानिक पावसामुळे पूर आल्याचे मानले जात नाही. तिबेटमधील हिमनदी सरोवराच्या स्फोटामुळे भोटे कोशी नदीला अचानक पूर आला असावा, असा अधिकार्‍यांचा संशय आहे. 2020 च्या आयसीआयएमओडी-यूएनडीपी अभ्यासानुसार, भोटे कोशी खोर्‍यात 122 हिमनदी सरोवरे आहेत. नेमके कोणते सरोवर फुटले हे अद्याप निश्चित झालेले नाही; त्याचा उगमस्थान निश्चित करण्यासाठी उपग्रह प्रतिमा आणि तांत्रिक तपासणीचा वापर केला जात आहे. तिमुरेमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. मृतांची आणि नुकसानीची नेमकी संख्या सध्या निश्चित केली जात आहे.

पंतप्रधान मोदींचा बालेन शाह यांच्याशी संवाद

नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. त्यामुळे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांच्याशी फोनवरून संवाद साधला. यावेळी नेपाळमधील जीवितहानीबद्दल नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. या संकटाच्या काळात भारताकडून शक्य ती सर्व मानवतावादी मदत देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

Massive floods in Nepal; fears that thousands of citizens, along with numerous villages, have been swept away.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

7 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

7 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

7 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

7 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

7 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

7 hours ago