महाराष्ट्र

मविआचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला

15 जागा निश्चित, महायुतीत दोन जागांसाठी रस्सीखेच

असा आहे मविआचा फॉर्म्युला

काँग्रेस 8, ठाकरे गट 4, शरद पवार गट 3, तर 2 जागांवर तिढा

मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या 17 जागांसाठी महाविकास आघाडी (मविआ) ने आपली रणनीती आणि जागावाटप निश्चित केले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुंबईतील ’टिळक भवन’ येथे पार पडलेल्या बैठकीनंतर या जागावाटपाची अधिकृत घोषणा केली. एकूण 17 पैकी 15 जागांवर आघाडीतील तिन्ही पक्षांचे एकमत झाले असून, उर्वरित दोन जागांबाबत अजून निर्णय झालेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या जागावाटपानुसार काँग्रेसने सर्वाधिक 8 जागा मिळवत आघाडीत ’मोठा भाऊ’ असल्याची भूमिका सिद्ध केली आहे. निश्चित झालेल्या 15 जागांच्या सूत्रानुसार, प्रत्येक पक्षाला मिळालेल्या मतदारसंघांचे चित्र स्पष्ट झाले आहे. काँग्रेस (8 जागा) या विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रावर पकड कायम ठेवत चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा-गोंदिया, अमरावती, अहिल्यानगर (अहमदनगर), सोलापूर, धाराशिव-बीड-लातूर आणि नागपूर (पोटनिवडणूक) या ठिकाणी लढवणार आहे. शिवसेना ठाकरे गट (4 जागा), मराठवाडा आणि कोकणावर लक्ष केंद्रित करत रायगड-रत्नागिरी, जळगाव, परभणी-हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर या 4 जागांवर आपले उमेदवार उतरवणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट (3 जागा) आपल्या पारंपरिक बालेकिल्ल्यांना प्राधान्य देत पुणे, सातारा-सांगली आणि ठाणे या 3 जागांवर निवडणूक लढवणार आहे. एकूण 17 पैकी 15 जागांवर कोणताही तिढा न ठेवता सुसंवादाने निर्णय झाल्याचा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. मात्र, नांदेड आणि नाशिक या उर्वरित 2 जागांवरून तिढा अद्याप कायम आहे. या दोन्ही जागांवर महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्षांनी आपला दावा सांगितला असल्याने, त्यावर अद्याप अंतिम एकमत होऊ शकलेले नाही. लवकरच आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांची पुन्हा बैठक होणार आहे. त्यानंतर या प्रलंबित दोन जागांचा अंतिम निर्णय जाहीर करण्यात येईल, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी दिली आहे.

भाजप दहा जागा लढविणार

दुसरीकडे महायुतीत भाजप दहा जागा लढवणार, हे निश्चित झाले आहे. एकनाथ शिंदेंची शिवसेना चार आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन जागांवर निवडणूक लढणार आहे. भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत छत्रपती संभाजीनगर व नाशिकच्या जागेवरून चर्चा सुरू आहे.

Mavia’s seat allocation formula has been finalized.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पिंपळगाव धूम येथे बिबट्याचा तरुणावर हल्ला

नागरिकांच्या धाडसामुळे टळला अनर्थ; भीतीचे वातावरण दिंडोरी : प्रतिनिधी दिंडोरी तालुक्यातील पिंपळगाव धूम येथे बिबट्याने…

13 seconds ago

संविधान बचाव समितीचा तिरंगा मोर्चा

निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी मालेगाव : प्रतिनिधी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीसह मतदार यादीच्या…

5 minutes ago

सिडकोत अतिक्रमणांवर कारवाई

तीन ट्रक विविध साहित्य जप्त सिडको : प्रतिनिधी सिडको विभागातील फुटपाथवर करण्यात आलेल्या अनधिकृत अतिक्रमणांविरोधात…

9 minutes ago

सिटी सेंटर मॉल ते विशाल पेट्रोल पंप मार्गावर वाहतुकीचा खोळंबा

रस्त्याच्या कामामुळे वाहनचालकांची कोंडी सिडको : प्रतिनिधी शहरातील सुरू असलेली रस्त्यांची कामे आणि नवरात्रोत्सवानिमित्त रस्त्यांवर…

12 minutes ago

कांद्याच्या दरात घसरण; 13 रुपयांपर्यंत दर कमी

पहिली कांदा एक्स्प्रेस 18 ला आगरतळ्यात नवी दिल्ली : प्रतिनिधी सणासुदीच्या तोंडावर सामान्य ग्राहकांसाठी दिलासादायक…

19 minutes ago

दिल्ली पोलिसांनी तिरंगा यात्रा रोखली

अभिजित दिपके, नेहा बोरा यांना अटक ♦♦♦ सेंट्रल पार्क बंद ♦♦♦ 22 हजार जवान तैनात…

33 minutes ago