राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय

अमेरिकेच्या दबावामुळे यूपीआय आणि रुपे व्यवहारांवर ’एमडीआर’ शुल्क

नवी दिल्ली : प्रतिनिधी
यूपीआय आणि रुपे कार्डद्वारे होणार्‍या व्यवहारांवर लवकरच ‘मर्चंट डिस्काउंट रेट’ (एमडीआर) म्हणजेच शुल्क लागू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्र सरकारने नुकतेच संसदेत ‘टॅक्सेशन अँड अदर लॉज (अमेंडमेंट) बिल 2026’ मंजूर केले आहे. यामुळे सध्याच्या ‘झीरो-एमडीआर’ (मोफत व्यवहार) धोरणात बदल करण्याचे कायदेशीर अधिकार सरकारला मिळाले आहेत. या नव्या कायद्यानुसार भविष्यात दोन हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या किंवा मोठ्या व्यापार्‍यांच्या व्यवहारांवर एमडीआर आकारला जाण्याची दाट शक्यता आहे.
भारतातील या संभाव्य धोरणात्मक बदलामागे अमेरिकेचा वाढता दबाव असल्याचे मानले जात आहे.
‘यूएस ट्रेड रिप्रेझेंटेटिव्ह’च्या 2026 च्या अहवालात भारताच्या ‘झीरो-एमडीआर’ धोरणावर आणि रुपे कार्डला मिळणार्‍या सरकारी पाठिंब्यावर तीव्र आक्षेप घेण्यात आला होता. भारताच्या या मोफत डिजिटल व्यवस्थेमुळे ‘व्हिसा’ आणि ‘मास्टरकार्ड’सारख्या मोठ्या अमेरिकन कंपन्यांचे व्यावसायिक नुकसान होत असून, त्यांना भारतीय बाजारात स्पर्धेसाठी समान विनाशुल्क होते, मात्र या ऐतिहासिक मंजुरीमुळे आता ’आरटीजीएस’ आणि ’एनईएफटी’ प्रमाणेच यूपीआयवरही शुल्क आकारणीचा मार्ग कायदेशीररीत्या मोकळा झाला आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत ’टॅक्सेशन अँड अदर लॉज (अमेंडमेंट) बिल 2026’ विचारार्थ मांडले, ज्याला सभागृहाने आवाजी मतदानाने मंजुरी दिली. डिजिटल पेमेंट व्यवस्था चालवणार्‍या बँका, फिनटेक कंपन्या आणि पायाभूत सुविधा पुरवणार्‍या संस्थांसाठी एक भक्कम आणि शाश्वत महसूल मॉडेल निर्माण करणे, हा यामागील मुख्य उद्देश असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे भविष्यात ग्राहक आणि छोट्या व्यावसायिकांच्या डिजिटल पेमेंटवर नाममात्र शुल्क लागू होऊ शकते. सदर व्यापक विधेयकात यूपीआय शुल्काव्यतिरिक्त आयकर कायदा, 2025 आणि वित्त कायदा, 2026 मध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा करण्याच्या तरतुदींचाही समावेश करण्यात आला आहे.

परदेशी कंपन्यांच्या हिताचा निर्णय
या संपूर्ण प्रकरणावरून विरोधी पक्षांनी मात्र सरकारला धारेवर धरले आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी आरोप केला आहे की, केंद्र सरकार अमेरिकेच्या दबावाखाली येऊन व्हिसा आणि मास्टरकार्डसारख्या परदेशी कंपन्यांना फायदा पोहोचवण्यासाठी भारताची मोफत डिजिटल पेमेंट व्यवस्था मोडीत काढत आहे. रिझर्व्ह बँकेकडे यूपीआय व्यवस्था विनाशुल्क चालवण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध असताना, दबावापोटी देशाची अत्यंत यशस्वी अशी मोफत यूपीआय प्रणाली धोक्यात आणली जात असल्याची जोरदार टीका विरोधकांनी केली आहे.

‘MDR’ charges on UPI and RuPay transactions due to US pressure.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 day ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 day ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

1 day ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

1 day ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

1 day ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 day ago