नाशिक

धर्मांतरासाठी महिलेचा मानसिक छळ

सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

सिडको : विशेष प्रतिनिधी
मुस्लिम धर्म स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे एका महिलेचा मानसिक व शारीरिक छळ करत तिचा जीव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात पाच पुरुष आणि एका महिलेसह सहा आरोपींविरुद्ध विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकार सन 2019 पासून सुरू होता. सदाशिवनगर येथील जुना कॅनॉल रोड, रेणुकानगर, वडाळा नाका व सारडा सर्कल परिसरात घडला. फिर्यादी महिलेने स्वतः तक्रार दाखल केली. अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
तक्रारीनुसार आरोपींनी फिर्यादीचा विश्वास संपादन करून सुरुवातीला चांगली वागणूक दिली आणि नंतर तिच्याशी लग्न केले. तिच्या वडिलांकडून तीन वेळा प्रत्येकी दोन लाख रुपये, असे एकूण सहा लाख रुपये उकळले. पहिल्यांदा गरोदर राहिल्यावर तिच्यावर मुस्लिम धर्म स्वीकारण्याची जबरदस्ती करण्यात आली.
तिने आणि तिच्या मुलीने हिंदू धर्म स्वीकारल्यामुळे आरोपींनी त्यांच्यावर राग व्यक्त करत हिंसाचार केला. सारडा सर्कल येथे आरोपी क्र.1 याने फिर्यादीचा रस्ता अडवून तिला चॉपर दाखवत तिच्या वडिलांची प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून देण्याची धमकी दिली. दुसर्‍यांदा गरोदर असताना तिला मारहाण करून तिचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. याशिवाय हिंदू देवी-देवतांबद्दल अपशब्द वापरून देवतांचे फोटो लाथ मारून घराबाहेर फेकून धार्मिक भावना दुखावण्यात आल्या. फिर्यादी ही खालच्या जातीची आहे, असे म्हणत तिचा अपमान करण्यात आला. तिच्या वडिलांची प्रॉपर्टी नावावर करण्यासाठी दबाव टाकण्यात आला. तिचे धर्मांतर करण्यासाठी तिला, तिच्या मुलीला व मुलाला धमकावण्यात आले. तक्रारीनुसार, सोन्याचे दागिने व पैसे जबरदस्तीने हिसकावून घेण्यात आले. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक हांडे आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक बागूल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

Gavkari Admin

Recent Posts

एसी लोकलमध्ये प्रवाशाचा चक्क छत्री उघडून प्रवास

एसी लोकलमध्ये प्रवाशाचा चक्क छत्री उघडून प्रवास शहापूर : साजिद शेख लोकल ही मुंबईतल्या प्रवाशांची…

20 hours ago

सर्प विज्ञानाची गरज

ह्मलोकेषु ये सर्पा शेषनाग परोगमा:। नमोस्तुतेभ्य: सर्पेभ्य: सुप्रीतो मम सर्वदा॥ ब्रह्मलोकामधील सर्व सर्पांचा राजा नागदेव…

22 hours ago

आकर्षक राख्यांनी बाजारपेठ सजली

यंदा राख्यांना महागाईची वीण नाशिक : प्रतिनिधी बहीण-भावाच्या नात्याची वीण घट्ट करणारा रक्षाबंधन सण दहा…

22 hours ago

तुजवीण शंभो मज कोण तारी!

पहिल्याच श्रावणी सोमवारी शिवालये गर्दीने फुलली नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी महादेव मंदिरांत…

22 hours ago

पाथर्डीत वर्षभरात एकाच रस्त्याचे चार वेळा काम

महापालिकेच्या कामाचे पितळ उघडे; नागरिकांत नाराजी इंदिरानगर : वार्ताहर पाथर्डी फाटा प्रभाग क्रमांक 31 मधील…

22 hours ago

माणिकराव कोकाटे अजित दादांच्या भेटीला

मुंबई: विधानसभेत रमी खेळत असल्याच्या मुद्द्यावरून जोरदार टीका झाल्यामुळे चर्चेत आलेले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे…

1 day ago