सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे समाजकल्याण विभागाला निवेदन
नाशिक ः प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त नाशिकमध्ये स्थापन करण्यात आलेल्या मुलींच्या शासकीय वसतिगृहात सुरू असलेल्या गंभीर गैरप्रकारांबाबत सम्यक विद्यार्थी आंदोलन (वंचित बहुजन आघाडीप्रणीत) यांनी समाजकल्याण विभागाकडे सविस्तर निवेदन दिले. यात तत्काळ कठोर कारवाईची मागणी केली आहे. प्राथमिक चौकशीत नियमभंग स्पष्ट होऊनही संबंधित गृहपालावर केवळ बदलीची कारवाई झाल्याने विद्यार्थिनींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
नाशिक येथील दुर्गानगर, पंचवटी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त स्थापन करण्यात आलेल्या मुलींच्या शासकीय वसतिगृहात जातीयवाद, भ्रष्टाचार, गैरव्यवहार तसेच विद्यार्थिनींचा मानसिक छळ होत असल्याच्या गंभीर तक्रारी समोर आल्या आहेत. यासंदर्भात सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने समाजकल्याण विभागाकडे लेखी निवेदन देण्यात आले.
या वसतिगृहातील गृहपाल श्रीमती विजयश्री बाबर यांच्याविरोधात यापूर्वी 8 सप्टेंबर 2025 रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर समाजकल्याण विभागाने नेमलेल्या चौकशी समितीच्या प्राथमिक अहवालात महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, एवढ्या गंभीर प्रकरणात संबंधित गृहपालांंना निलंबित करण्याऐवजी त्याच पदावर पुणे येथे बदली देण्यात आल्याने विद्यार्थिनींमध्ये असंतोष पसरला आहे.
यावेळी उपस्थित पीडित विद्यार्थिनींनी तीव्र भावना व्यक्त करत, ‘समाजकल्याण विभाग जर इतका वेळ लावत असेल तर हा कसला समाजकल्याण विभाग?’ असा सवाल उपस्थित केला.
मागील पाच ते सहा महिन्यांपासून विद्यार्थिनींचा निर्वाह भत्ता प्रलंबित असल्याने अनेक विद्यार्थिनींना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.जागेअभावी तब्बल 14 ते 15 विद्यार्थिनींना लायब्ररीमध्ये राहावे लागत आहे. त्यांच्यासाठी केवळ एकच स्वच्छतागृह उपलब्ध आहे. स्वच्छतेचा अभाव, दुर्गंधी व अपुर्या सुविधांमुळे विद्यार्थिनींच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष मिहिर गजबे, वंचित बहुजन युवा आघाडीचे शहराध्यक्ष दीपक (दादा) पगारे, तसेच आदित्य निरभवणे, वैष्णवी पाटील, भूमिका केदारे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत. चौकशी समितीचा संपूर्ण अहवाल व सदस्यांची नावे जाहीर करावीत. दोषी अधिकार्यांची जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करावी. श्रीमती विजयश्री बाबर यांना तत्काळ निलंबित करून अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा. विद्यार्थिनींचा प्रलंबित निर्वाह भत्ता तत्काळ वितरित करावा. लायब्ररीमध्ये राहणार्या विद्यार्थिनींसाठी पर्यायी निवासव्यवस्था करावी. वसतिगृहातील मूलभूत सोयी-सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात. या मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
Misconduct in government girls’ hostel
- आनंदा जाधव शासनाने राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर केला. त्यानंतर दुसर्या यादीत राहिलेले तालुके समाविष्ट…
- प्रशांत पोतदार क्षणभर कल्पना करून बघा बरं. मीच जर माझ्या कुटुंबात नसेल तर? असा…
- अश्विनी पांडे सिंहस्थाच्या कामांना सुरुवात होण्यास झालेला विलंब, निविदाप्रक्रिया आणि निधी मंजुरीसाठी लागलेला वेळ,…
- गोरख काळे महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदाची प्रक्रिया सुरू झाली असून, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महासभा होऊन…
तव प्रतिभेचे रंग किती तू मज दाखवले साक्षात्कार, विभावन, अनुभूती, दृष्टान्त असे सगळे एकाच जन्मी…
रशियाकडून तेल घेऊ नका, अशी दवंडी पिटणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर…