नाशिक पश्चिम विभागात दहा कोटींपैकी 43 लाखांची वसुली
नाशिक : प्रतिनिधी
शहरातील करदात्यांकडील थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिका प्रशासनाने आता विशेष मोहीम हाती घेतली आहे. प्रलंबित मालमत्ता व पाणीपट्टीची रक्कम वसुलीसाठी प्रशासनाकडून बाइक रॅलीद्वारे जनजागृती करून वसुली केली जाणार आहे. सहा विभागांपैकी नाशिक पश्चिममध्ये या मोहिमेला सुरवात करण्यात आली आहे.
दरम्यान, थकबाकीदार मिळकतधारकांकडून करवसुली गतिमान करण्यासाठी जप्ती व वॉरंट बजावणी कारवाईसोबत नागरिकांमध्ये कर भरण्याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने जनजागृतिपर बाइक रॅलीचे आयोजन केले आले.
या संदर्भातील बैठक उपआयुक्त (कर) सुवर्णा दखणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पश्चिमचे विभागीय अधिकारी चंदन घुगे यांच्या उपस्थितीत पार पडली. या मोहिमेत किरण पोटे, प्रशांत लोणे, राजाराम कातडे (सहाय्यक अधीक्षक) तसेच वसुली कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. या मोहिमेदरम्यान पश्चिम विभागातील प्रमुख थकबाकीदार मिळकतधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, संबंधित ठिकाणी जप्ती व वॉरंटची अंमलबजावणी करण्यात आली. संबंधित मालमत्तांवर नोटीस चिकटवून कर भरण्याबाबत अंतिम सूचना देण्यात आल्या. काही ठिकाणी कर रकमेचा धनादेश स्वीकारण्यात आला असून, कर वसुलीची कार्यवाही तातडीने करण्यात येत आहे. नागरिकांनी प्रलंबित मालमत्ता कर व पाणीपट्टी तत्काळ भरावा, अन्यथा जप्ती, सीलिंग व पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी महापालिका कार्यालयात किंवा ऑनलाइन माध्यमातून कर भरून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
246 जणांना जप्तीच्या नोटिसा
महापालिका प्रशासनाने मंगळवारी 246 जणांना जप्तीच्या नोटिसा बजावल्या. संबंधितांकडे दहा कोटी रुपये थकबाकी असून, त्यांच्याकडून 43 लाखांची वसुली झाली.
शहर विकासकामांसाठी महसूल महत्त्वाचा घटक असून, थकबाकी भरून महापालिकेला सहकार्य करावे. सदर मोहीम पुढील काही दिवस पश्चिम विभागात सुरू राहील व ती अधिक तीव्र करण्यात येईल.
– सुवर्णा दखणे, उपायुक्त, कर विभाग, मनपा
- आनंदा जाधव शासनाने राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर केला. त्यानंतर दुसर्या यादीत राहिलेले तालुके समाविष्ट…
- प्रशांत पोतदार क्षणभर कल्पना करून बघा बरं. मीच जर माझ्या कुटुंबात नसेल तर? असा…
- अश्विनी पांडे सिंहस्थाच्या कामांना सुरुवात होण्यास झालेला विलंब, निविदाप्रक्रिया आणि निधी मंजुरीसाठी लागलेला वेळ,…
- गोरख काळे महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदाची प्रक्रिया सुरू झाली असून, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महासभा होऊन…
तव प्रतिभेचे रंग किती तू मज दाखवले साक्षात्कार, विभावन, अनुभूती, दृष्टान्त असे सगळे एकाच जन्मी…
रशियाकडून तेल घेऊ नका, अशी दवंडी पिटणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर…