कुटुंबाकडून दोन दिवस शोधमोहीम; चांदवडमध्ये थरारक बचावकार्य
चांदवड : वार्ताहर
दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 76 वर्षीय वृद्ध महिलेचा शोध घेत असताना त्या चांदवड बसस्थानक परिसरातील विहिरीत जिवंत अवस्थेत आढळून आल्या. स्थानिक नागरिक, पोलीस प्रशासन आणि चांदवड नगरपरिषदेच्या आपत्कालीन पथकाने तत्परतेने बचावकार्य राबवत चंद्रभागा वरगटे यांना विहिरीतून सुखरूप बाहेर काढले. या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती.
चांदवड शहरातील रहिवासी चंद्रभागा वरगटे या 27 ऑगस्टपासून बेपत्ता होत्या. कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. मात्र त्या सापडून न आल्याने पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली होती. त्यानंतर शोधमोहीम सुरू असताना बसस्थानक परिसरातील एका विहिरीत त्या पडल्याचे निदर्शनास आले.
विहिरीत त्या जिवंत आहेत की नाही, याबाबत संभ्रम असताना गणेश पारवे यांनी विहिरीतील पाइप व दोर हलवून पाहिले. त्यावेळी आतून हालचाल जाणवली. त्यामुळे चंद्रभागा वरगटे या जिवंत असल्याचे स्पष्ट झाले. ही माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलीस प्रशासन आणि चांदवड नगरपरिषदेच्या आपत्कालीन पथकाला पाचारण केले. त्यानंतर दोर व आवश्यक साहित्याच्या सहाय्याने बचावकार्य सुरू करण्यात आले. विहिरीची परिस्थिती लक्षात घेऊन अत्यंत काळजीपूर्वक प्रयत्न करत चंद्रभागा वरगटे यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. या बचावकार्यात गणेश पारवे, सागर यशवंते, नारायण कोकरे, सतीश कवडे यांच्यासह स्थानिक नागरिकांनी महत्त्वाची भूमिका बजावली. विहिरीतून बाहेर काढल्यानंतर आजींची प्रकृती लक्षात घेऊन त्यांना तातडीने चांदवड उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असून पुढील उपचारासाठी त्यांना पिंपळगाव येथे हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे बसस्थानक परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. संबंधित विहिरीच्या परिसरात यापूर्वीही चार ते पाच दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी विहिरीभोवती तातडीने संरक्षक जाळी व कठडे उभारण्याची गरज व्यक्त होत आहे.
विहिरीभोवती संरक्षक जाळी, कठडे उभारावेत
बसस्थानक परिसरातील संबंधित विहिरीच्या ठिकाणी यापूर्वीही चार ते पाच दुर्घटना घडल्या आहेत. त्यामुळे भविष्यातील अनुचित घटना टाळण्यासाठी विहिरीभोवती तातडीने संरक्षक जाळी व कठडे उभारावेत, अशी मागणी चांदवड नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे पत्राद्वारे केली आहे.
Missing elderly woman found alive in a well.
पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…
तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…
ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…
अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…
महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…
विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…