103 किमी रस्ते खोदण्यास परवानगी नाकारली; मनपा आयुक्तांचा दणका
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक शहरात घरोघरी गॅस कनेक्शन देण्यासाठी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड अर्थात, एमएनजीएलकडून सन 2018 पासून शहरात खोदकाम सुरू आहे. परंतु सध्या सिंहस्थाची कामे सुरू असतानाच एमएनजीएलकडून सुरू असलेल्या खोदकामामुळे पावसाळ्यात शहरातील नागरिकांना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागतोय. यातच एमएनजीएलने पुन्हा 103 किलोमीटर रस्ते फोडण्याची परवानगी मागितली असता, मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी सक्त होत सदर परवानगी नकारात कंपनीला दणका दिला. गणेशोत्सवात नागरिकांना कुठलाही त्रास नको, अशी भूमिका आयुक्तांनी घेतला आहे.
शहरात एमएनजीएलकडून सद्यःस्थितीत 47 हजार गॅस कनेक्शनचे काम पूर्ण झाले आहे. महापालिकेने सद्यःस्थितीत परवानगी देता येणार नसल्याचे स्पष्टीकरण देत, गणेशोत्सवापर्यंत खोदकाम करू नये, असे निर्देश आयुक्त मनीषा खत्री यांनी कंपनीला दिले आहेत.
शहरात पाऊस सुरू असतानाच खड्ड्यांचे प्रमाण वाढल्यानंतर महापालिकेला नागरिकांचा रोष सहन करावा लागला होता. त्यामुळे गेल्या महासभेत खड्ड्यांचे खापर एमएनजीएल कंपनीवर फोडण्यात आले होते. परंतु कंपनीने आरोपांच्या फैरी झाडल्यानंतर सर्व आरोप फेटाळून लावले होते. रस्ते फोडण्यासाठी आवश्यक जीएसआय मॅप देण्याचे आदेशही आयुक्तांनी एमएनएजीलला दिले आहेत. दरम्यान, एमएनजीएलकडून शहरात आतापर्यंत 47 हजार घरांमध्ये गॅसकनेक्शन देण्यात आल्याचे समोर आले आहे. शहरातील रस्त्यांच्या क्रॉसिंगच्या ठिकाणी तीन किलोमीटर खोदकाम करण्यास परवानगी मागत आणखी एक लाख गॅसकनेक्शनसाठी रस्ते फोडण्याची परवानगी मागितली. परंतु ही मागणी महापालिकेने फेटाळत सध्या नागरिकांना कुठलाही त्रास नको, अशी भूमिका घेतली आहे.
एकूण 740 किलोमीटरची मंजुरी
नाशिक महापालिका हद्दीत भूमिगत गॅस पाइपलाइन टाकण्यासाठी सुमारे 740 किलोमीटरची अधिकृत मंजुरी आहे. त्यापैकी तब्बल 640 किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. सद्यःस्थितीत 100 किमी रस्ते खोदकाम बाकी आहे, असे स्पष्टीकरण दिले होते. त्यानंतर महापालिकेने रस्ते पूर्ववत करण्यापूर्वी कंपनीला शहरातील गॅस पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. जीएसआय मॅपिंगही मागवले होते. त्यानंतरच परवानगी देऊ, अशी भूमिका घेतली होती.
MNGL barred from digging up roads.
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…
- अॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्या व्यक्तीला…
- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…
चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…