सिन्नर-भरवीर मार्गावर दोन दिवस ठराविक वेळेत वाहतूक बंद; सोमवारी अवघ्या 30 मिनिटांत उभारले गॅन्ट्री
सिन्नर : प्रतिनिधी
समृद्धी महामार्गावरील वाहतूक अधिक सुरक्षित व नियंत्रणाखाली आणण्यासाठी इंटेलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिमची उपकरणे बसविण्याच्या कामाला वेग आला आहे. या कामाचा भाग म्हणून महामार्गावर गॅन्ट्री उभारण्यात येत आहे. मोठ्या यंत्रसामग्रीमुळे गॅन्ट्री बसविताना काही काळ वाहतूक थांबविण्यात येत आहे. सोमवारी (दि. 31) नियोजित 45 मिनिटे ते एक तासाच्या तुलनेत अवघ्या 30 मिनिटांत गॅन्ट्री उभारून वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
समृद्धी महामार्गाच्या नागपूर मार्गावरील चॅनल क्रमांक 580.3 येथे सोमवारी गॅन्ट्री उभारणीसाठी वाहतूक नियोजनबद्ध पद्धतीने थांबविण्यात आली होती. महामार्ग पोलीस आणि महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानांनी वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी सांभाळली. वाहनचालक आणि प्रवाशांनीही पोलिसांना सहकार्य केले.
गॅन्ट्री उभारणीच्या ठिकाणी बॅरिकेडिंग, सुरक्षा शंकू, माहिती फलक, ध्वजधारी कर्मचारी आणि वाहतूक नियंत्रकांची व्यवस्था करण्यात आली होती. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता एस. व्ही. कुलकर्णी यांनी वाहनचालकांनी वाहतूक बंदच्या वेळा लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन केले आहे. वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालक तथा पोलीस अधीक्षक डॉ. सुनील भारद्वाज यांनी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करून अटी-शर्तींच्या अधीन राहून गॅन्ट्री उभारणीच्या कामास परवानगी दिली आहे.
भरवीर-इगतपुरी मार्गावरही वाहतुकीला ब्रेक
दि. 4, 5 आणि 7 सप्टेंबर रोजी भरवीर प्रवेशद्वार क्रमांक 22 ते इगतपुरी प्रवेशद्वार क्रमांक 23 या मार्गावर गॅन्ट्री उभारणीचे काम करण्यात येणार आहे. या दिवशीही मुंबईच्या दिशेची वाहतूक दुपारी 12 ते 1, तर नागपूरच्या दिशेची वाहतूक दुपारी 3 ते 4 या वेळेत थांबविण्यात येणार आहे.
सुरक्षेसाठी गॅन्ट्रीची यंत्रणा
समृद्धी महामार्गावरील वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी गॅन्ट्रीवर सीसीटीव्ही कॅमेरे आणि अन्य उपकरणे बसविण्यात येणार आहेत. गॅन्ट्रीमुळे महामार्गावरील वाहतुकीवर देखरेख ठेवणे, वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवणे तसेच अपघात किंवा अन्य घटना घडल्यास नियंत्रण कक्षाला तत्काळ माहिती मिळविणे शक्य होणार आहे.
सिन्नर-भरवीर मार्गावर आजपासून वाहतूक बंद
मंगळवार (दि. 1) आणि बुधवार (दि. 2) सप्टेंबर रोजी सिन्नर प्रवेशद्वार क्रमांक 21 ते भरवीर प्रवेशद्वार क्रमांक 22 या मार्गावर गॅन्ट्री उभारणीचे काम केले जाणार आहे. त्यामुळे मुंबईच्या दिशेची वाहतूक दुपारी 12 ते 1 आणि नागपूरच्या दिशेची वाहतूक दुपारी 3 ते 4 या वेळेत थांबविण्यात येणार आहे. या वेळेत समृद्धी महामार्गावरून प्रवास करणार्या वाहनचालकांनी वाहतूक बंदचा कालावधी लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Gantry installation on Samruddhi Expressway picks up pace; traffic faces a ‘brake’
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…
- अॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्या व्यक्तीला…
- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…
चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…