नाशिक

कौटुंबिक फोटोंमध्ये छेडछाड व फेरफार करून वापर : मंत्री गिरीश महाजन

नाशिक : प्रतिनिधी
मागील काही दिवसांपासून माझ्याशी संबंधित फोटो आणि पोस्ट जाणूनबुजून काही समाज माध्यमांवर म्हणजेच सोशल मीडिया, फेसबुक , इंस्टाग्राम, एक्स व इतर न्यूज पोर्टलवरून प्रसारित करण्यात येत आहेत. या फोटोसंदर्भात वस्तुस्थिती जनतेसमोर मांडणे आवश्यक आहे. या फोटोमधील मुलगी माझ्या घनिष्ट कौटुंबिक संबंधातील मुलगी आहे. माझ्या घरगुती, कौटुंबिक व धार्मिक कार्यक्रमात त्यांचे कुटुंबीय व माझे कुटुंबीय एकत्र येत असतो. त्यांचे कुटुंबीय व माझे कुटुंबीय यांचे माझ्यासोबत अनेक फोटो आहेत. ते फोटो आमचे खासगी आहेत.
माझ्या फोटोमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मूळ फोटोग्राफमध्ये क्रॉपिंग करून छेडछाड करण्यात आलेली आहे. अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. फोटोमध्ये छेडछाड व फेरफार करून व त्यातून बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही महाराष्ट्राच्या राजकारणाची संस्कृती नाही. ज्या लोकांनी अशा चुकीच्या पद्धतीने समाज माध्यमावर फोटो प्रसारित करून बदनामीचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या विरुद्ध आम्ही कायदेशीर तक्रार सायबर पोलिस स्टेशन केलेली आहे. त्यानुषंगाने रीतसर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी या गुन्ह्याची दखल घेऊन संबंधित समाजमाध्यमच्या अकाउंंटधारकांना सदर मजकूर काढून टाकण्यासाठी रीतसर व कायदेशीर नोटीस दिली आहे. कायदेशीर प्रक्रिया सुरू असतानादेखील काही समाजमाध्यमावर अजूनही बदनामीकारक मजकूर प्रसारित करण्यात येत आहे. अशा अकाउंंटधारकांविरुद्ध न्यायालयात जाऊन कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत दाद मागणार आहे.
समाजमाध्यमाचा वापर करून व्यक्तिगत, कौटुंबिक व महिलेची बदनामी करण्याचा केलेला हा प्रयत्न ही महाराष्ट्राच्या राजकारणातील पातळी किती खाली गेली आहे यावरून लक्षात येते. आम्ही दाखल केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने सायबर पोलिसांनी सायबर तंत्रज्ञांचा वापर करून शोध घेतला असता. सदरील फोटोमध्ये छेडछाड/ फेरफार करून बदल करण्यात आला आहे, असे तांत्रिक तपासांती सायबर पोलिसांनी प्रमाणित केले आहे.
सत्य जनतेसमोर येईल आणि कायद्याच्या चौकटीत राहून दोषींवर योग्य ती कारवाई होईल, याबाबत मला पूर्ण विश्वास आहे, असे मंत्री महाजन यांनी स्पष्ट केले.

Use of family photos after tampering and alteration: Minister Girish Mahajan

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

2 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

3 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

3 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

3 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

3 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

3 days ago