नाशिक

खैरगावला जमावाचा शस्त्रांनी कुटुंबावर हल्ला

फिर्यादीनुसार 10 ते 15 जणांचा सहभाग; चार संशयितांना अटक

घोटी : प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यातील खैरगाव येथे जमिनीच्या वादातून 10 ते 15 जणांच्या जमावाने एका कुटुंबावर धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याची गंभीर घटना घडली. याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीनुसार गांगड कुटुंबातील चार जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर घोटी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, पोलिसांनी चार संशयितांना अटक केली आहे.
पोलीस नोंदीनुसार, 15 एप्रिलला रात्री साडेआठच्या सुमारास शिदवाडी खैरगाव (ता. इगतपुरी) येथे ही घटना घडली. फिर्यादी बबलू गुणाजी गांगड (वय 27) यांनी दिलेल्या तक्रारीप्रमाणे, जमिनीच्या वादातून आरोपींनी संगनमताने एकत्र येत कुटुंबीयांवर हल्ला चढवला. तलवारीसारखी धारदार शस्त्रे, लोखंडी रॉड व लाकडी दांडक्यांचा वापर करून मारहाण करण्यात आली, तसेच शिवीगाळ व दमदाटीही करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या हल्ल्यात गुणाजी भागा गांगड (वय 52), वनिता गुणाजी गांगड (वय 45), बबलू गुणाजी गांगड (वय 27) आणि मच्छिंद्र गुणाजी गांगड (वय 32) हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी चार संशयितांना अटक केली आहे. यामध्ये संशयित मच्छिंद्र पोकळे, कृष्णा पोकळे, भास्कर पोकळे, संतोष पोकळे, मनोहर शिद, माणिक शिद (सर्व रा. शिदवाडी), त्यापैकी घोटी पोलिसांनी चार संशयितांना अटक केली. आणखी काही संशयित फरार आहेत. या गंभीर प्रकारात घोटी पोलिसांनी 326 चा गुन्हा दाखल केला. संबंधित फिर्यादीच्या कुटुंबाने 307 चा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. अन्यथा जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे मागणी करणार आहोत, अशी माहिती दिली आहे. पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मण धकाटे व परीक्षित इंगळे तपास करीत आहेत.

Mob attacks family with weapons in Khairgaon

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सोशल मीडियावरही ’आयपीएल’चा फीव्हर; हिताचे रक्षण व्हायला हवे!

आयपीएल अर्थात, इंडियन प्रीमियर लीगचे हे एकोणिसावे वर्ष आहे. सलग एकोणीस वर्षे आपली लोकप्रियता टिकवून…

7 hours ago

मान्सून अंदाज चिंताजनक

चार वर्षांपूर्वी म्हणजे 24 फेब्रुवारी 2022 रोजी रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाले. या युद्धाचा परिणाम जगावर…

7 hours ago

गणवेश-साहित्य खरेदीत शाळांच्या सक्तीला लगाम!

पालकांना पसंतीच्या दुकानांतून खरेदीची मुभा; शिक्षण विभागाचे परिपत्रक सिन्नर : प्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या गणवेश, वह्या-पुस्तके तसेच…

7 hours ago

सिन्नरमध्ये आजपासून क्रिकेटचा महासंग्राम

‘आयपीएल’च्या धर्तीवर खेळाडूंचा लिलाव; 16 संघांमध्ये रंगणार टेनिस बॉल डे-नाईट स्पर्धा सिन्नर : प्रतिनिधी सिन्नर…

7 hours ago

कळवणला प्रसूतीनंतर काही तासांत मातेचा मृत्यू

उपजिल्हा रुग्णालयातील प्रकार कळवण : प्रतिनिधी प्रसूतीसाठी कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या मातेचा प्रसूतीनंतर काही…

7 hours ago

महिला अत्याचारांवर ‘झीरो टॉलरन्स’साठी आज बैठक

नाशिक : प्रतिनिधी शहरात अलीकडे घडलेल्या विविध घटनांमधून महिलांचे लैंगिक शोषण तसेच धर्मांतरणासारख्या प्रकारांचा पर्दाफाश…

7 hours ago