ग्रामीण पोलिसांकडून शोधण्याचे प्रमाण 85 टक्के, तर 15 टक्के मुलींचा शोध अद्याप सुरू
नाशिक : देवयानी सोनार
सोशल मीडियाचा अतिरेकी वापर, भिन्न लिंगी व्यक्तीसोबतचे आकर्षण, प्रेमप्रकरणे, झटपट श्रीमंती, बोगस विवाह रॅकेटद्वारे पैसे कमावणे, गरिबी, सिनेसृष्टीचे आकर्षण, वाईट संगत आदी अनेक कारणांमुळे किशोरवयीन तसेच 18 वर्षांवरील मुली, महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या दीड वर्षात तीन हजार 251 मुली- महिला बेपत्ता झाल्या होत्या. त्यांपैकी दोन हजार 118 मुली- महिलांना शोधण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले. 393 मुली- महिलांचा शोध घेतला जात आहे.
18 वर्षांखालील आणि 18 वषार्ंवरील मुली-महिलांचे बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. जानेवारी ते डिसेंबर 2025 मध्ये दोन हजार 455 महिला बेपत्ता झाल्या होत्या. यात 2005 प्रकरणांची नोंद झाली होती. त्यांपैकी एक हजार 245 महिला शोधण्यात आल्या. 130 प्रकरणे अद्याप प्रलंबित आहेत. 450 मुलींची प्रकरणे नोंदली गेली असून, त्यांपैकी 372 मुली सापडल्या, तर 68 प्रकरणे प्रलंबित आहेत.
जानेवारी ते मार्च 2026 पर्यंत 549 महिला बेपत्ता झाल्या. त्यांपैकी 424 महिला सापडल्या. 125 प्रकरणांत अद्याप शोध बाकी आहे. 247 मुली बेपत्ता झाल्या. त्यांपैकी 77 सापडल्या, तर 70 प्रकरणे प्रलंबित आहेत.
मुलगी म्हणजे आई-बापाच्या जीवाला घोर असे मानले जाते. मुलींना शिक्षण, नोकरी करताना सुरक्षित वातावरण मिळावे, तसेच मित्रमैत्रिणी, नातेवाईक यांच्यासोबत वावरताना आपली मुलगी सुरक्षित आहे ना, याचाच विचार आजचे पालक करताना दिसतात. पण सोशल मीडिया, प्रेम, अनैतिक संबंध, गरिबी, घरातील वाद, झटपट श्रीमंत होण्याचे खूळ, सिनेसृष्टीचे आकर्षण, चोरी, वाईट संगत, स्टंटबाजी करणे, रील्सचा नाद, मित्रमैत्रिणींची फूस आदी कारणांमुळे मुली-महिलांचे घरातून पळून जाण्याचे प्रमाण चिंताजनक आहे.
ग्रामीण व शहरी भागातील घटनांमध्ये पालकांचे स्थलांतर, शहरी भागाचे आकर्षण, आर्थिक अडचणी व शैक्षणिक कमतरता ही कारणे आहेत. या बेपत्ता झालेल्या मुली- महिलांचा शोध घेण्यासाठी ग्रामीण पोलीस प्रशासनाने शोधमोहीम आणि ऑपरेशन मुस्कान यासारख्या मोहिमा राबविल्या आहेत. त्याद्वारे तीन हजार 251 बेपत्ता मुली-महिलांपैकी दोन हजार 118 मुली-महिलांना शोधण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले. पण मुली-महिला बेपत्ता होण्याचे वाढते प्रमाण लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज आहे.
महिला मुली
वर्ष हरवले मिळाले प्रलंबित हरवले मिळालेे प्रलंबित
2025 2,075 1,945 130 590 532 58
2026 549 424 125 147 77
70
बेपत्ता झालेल्या मुली महिलां सापडल्यावर त्यांची इच्छा असल्यास त्यांच्या पालक, पतीच्या स्वाधीन केले जाते. इच्छा नसल्यास महिला वसतीगृहात ठेवले जाते. 18 वयोगटाच्या आतील असल्यास बालसुधारगृहात ठेवले जाते.
More than three thousand girls and women have gone missing in the district in one and a half years