मोखाडा तालुक्यातील गोमघर नजीक मोटारसायकलींची समोरासमोर  धडक

मोखाडा तालुक्यातील गोमघर नजीक मोटारसायकलींची समोरासमोर  धडक

दोन  ठार तर दोन जण गंभीर

मोखाडा :प्रतिनिधी

तालुक्यातील गोमघर नजीक गोमघरच्या सपाटीला दोन मोटार सायकलींची समोरासमोर जोरदार टक्कर झाली आहे.दोन्हीही मोटारसायकल वेगात असल्याने  मोटारसायकल वरील पाचही व्यक्ती गंभीर जखमी झालेल्या होत्या.यातील दोघांचा मृत्यू झाला असून इतर गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत खोडाळा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहापूर तालुक्यातील विहीगांव येथून गोमघर मार्गावरून वाडा बाजूकडे एम् एच् 04 एल यु 8286 या युनीकॉन मोटारसायकल ने लक्ष्मण अशोक गांगड 28,दिलीप गांगड 29,व देवीदास कृष्णा गांगड 30 वर्षं हे तीघे सकाळी 11-30 वाजता जात असताना गोमघर पैकी बोट्याचीवाडी येथील अनील यशवंत सवरा हा आपल्या वडीलांना घेण्यासाठी मोटार सायकल क्रमांक एम् एच् 15 एफ् वाय 9327 या गाडीने येत खोडाळा येथे येत असताना दोन्हीही गाड्यांची समोरासमोर भिषण धडक झाली असून यात लक्ष्मण गांगड,विहीगाव व अनील यशवंत सवरा,बोट्याचीवाडी या दोघांचा मृत्यू झाला आहे तर इतर तीघांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना अधिक उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

बालवयीन दुचाकीस्वारांना लगाम कोण लावणार.?

मोटार सायकल स्वार हे वेगावर नियंत्रण ठेवून चालवत नसल्याने अशा दुर्घटना घडत असतात.त्यातच खोडाळा येथील बाजारपेठेतही व्यापाऱ्यांची अल्पवयीन नव्हे तर बालवयीन मुले बिनधास्त बाजारपेठेतून दुचाकीवरुन सवारी करत असतात तर काही हौशी पालक आपल्या पाल्यांच्या हातात थेट चार चाकीचे स्टेअरींग देत असल्याने आश्चर्य वाटते. मात्र अनावधानाने किंवा पुरेशी समज नसल्याने कोणतीही संभाव्य अनूचित घटना घडून अपघाताला निमंत्रण दिले जाण्याचा धोका टाळता येणार नाही.मात्र दस्तूरखुद्द पालकच पाल्यांच्या हट्टाला खतपाणी घालत असल्याने मोखाडा पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. त्यांनाच या अवाजवी लाडाला वेसन घालून बालकांना दुचाकी सवारीपासून रोखत पालकांचे समूपदेशन करण्याची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.

शव वाहिनीची गरज अधोरेखित….

खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे कार्यक्षेत्र विस्तीर्ण आहे.या भागात मोठ्या प्रमाणावर आकस्मिक घटना घडून प्रसंगी जीवीतहानीही घडत असते. मात्र खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राकडे स्वताची शववाहीनी नसल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेह आणणे अथवा पुढे मोखाडा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी शव पाठवणे अडचणीचे ठरत असते. त्यामूळे स्थानिक आमदार, खासदार महोदयांनी याकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे अत्यावश्यक ठरत आहे.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

13 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

13 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

13 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

13 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

13 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

13 hours ago