आस्वाद

सोशल मीडिया एक सुरुंग!

@ प्रतीक्षा चौधरी

—–/-/–——/  ///////

दिवसेंदिवस सोशल मीडियाचा वाढता वापर हा काही नवीन विषय नाही. दिवसाची सुरुवात आणि दिवसाचा शेवट हा ज्या साधना शिवाय होऊ शकत नाही तो म्हणजे मोबाइल. मोबाइलमधील विविध अ‍ॅप्स आणि त्याबद्दलची वाढती उत्सुकता त्यांनी नेहमीच माणसाला त्याच्या वेढ्यात ओढले. त्याचे वाढते आकर्षण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठीच इतकं महत्त्वाचं झालंय की, मोबाइलशिवाय कोणी एक दिवसही राहू शकत नाही.
व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम, फेसबुक यांचा फक्त तरुण पिढीतच नाही, तर लहान आणि मोठ्यांमध्येदेखील वाढलेलं उत्साहाचं प्रमाण आहे. लहान मुलं तर त्या मोबाइल शिवाय जेवण सुद्धा करत नाहीत. काहींना मोबाइल बघितल्याशिवाय चैनच पडत नाही. काही प्रमाणात सोशल मीडियाचा वापर हा चांगला केला तर तो फायद्याचादेखील आहे. पण त्याचा वाढता दैनंदिन वापर हा अतिशय हानिकारक आहे. कारण जितके त्याचा चांगला उपयोग करताहेेत तितकेच वाईटदेखील वापर करता आहेत. सोशल मीडियावरून ब्लॅकमेलिंग करणे, किडनॅपिंगचे प्रमाण वाढणे, हे प्रकार व्हायला लागले आहेत. सोशल मीडियावर रील्स बनवून, अनेक जण विविध चॅनल बनवून पैसेदेखील कमावत आहेत. आपल्या बिझनेसची अ‍ॅॅडव्हर्टाइझमेंट करत आहेत. कोणत्याही गोष्टीचा प्रमाणात वापर केला तर तो योग्य आणि अति प्रमाणात केला तर तो अयोग्य ठरत असतो. कधी जाणवतं की, या सोशल मीडियाचा वापर टाळण्याचे ठरवले तर माणसाला खूप त्रास होतो. कितीही नाही म्हटले तरी माणसाला आणि मानसिकतेला लागलेला हा एक सुरुंगच आहे, जो हळूहळू भावनिकतेला, जिव्हाळ्याला पोखरून टाकेल.

Social media is a tunnel!

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

14 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

14 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

14 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

14 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

14 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

14 hours ago