नाशिक

थकबाकीचा डोंगर नऊशे कोटींवर

महापालिका प्रशासन हतबल

नाशिक : प्रतिनिधी
शहरातील मिळकतदारांकडील थकबाकी तब्बल 990 कोटी 78 लाखांच्या घरात पोहोचली आहे. वारंवार आवाहन करूनही वसुली होत नसल्याने महापालिका प्रशासन हतबल झाले आहे. दि. 1 एप्रिल ते दि. 2 सप्टेंबर 2026 पर्यंत 138 कोटी 25 लाखांचीच वसुली करण्यात कर विभागाला यश आले आहे. दरम्यान, यंदा अभय योजना देण्यास मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी नकार दिल्याने थकबाकी हजार कोटींवर जाण्याची शक्यता आहे.
नाशिक महापालिकेच्या कर संकलनाला यंदा आयुक्त खत्री यांनी साडेतीनशे कोटी वसुलीचे उद्दिष्ट दिले आहे. दरम्यान, नियमित कर व मागील काही वषार्र्ंपासूनची थकबाकीचा आकडा थेट नऊशे कोटींच्या पुढे गेला आहे. त्यातच कर विभागातील कर्मचार्‍यांवर कुठली ना कुठली जबाबदारी असल्याने थकबाकी वसुलीत अडथळे येत असल्याचे चित्र आहे.
शहरात एकूण सहा लाख 12 हजार मिळकतदार असून, त्यांच्याकडून दरवर्षी घरपट्टी व पाणीपट्टीची वसुली केली जाते. थकबाकी न भरणार्‍यांविरोधात महापालिका नोटिसा पाठवून मालमत्तेवर कारवाई करण्याचा इशारा देत असते. दरम्यान, लोकप्रतिनिधींची सत्ता असल्याने काही मिळकतदारांना नोटिसा धाडू नये, अशी भूमिका घेतली जात असल्याचे चित्र आहे. महापालिकेच्या उत्पन्नाचे स्रोेत हे प्रामुख्याने करातून मिळणारी रक्कम व बांधकाम परवान्यातून मिळणारे उत्पन्न आहे. गेल्या वर्षी करवसुलीची रक्कम सव्वातीनशे कोटींच्या घरात गेली होती. त्यामुळे यंदा प्रशासनाला जास्तीत जास्त वसुलीची अपेक्षा आहे. यंदा कर विभागाच्या कर्मचार्‍यांना जनगणना व नंतर मतदार पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमाला लावल्याने त्याचा मोठा परिणाम वसुलीवर झाल्याचे चित्र
आहे.

थकबाकीची माहिती याप्रमाणे
विभाग                     एकूण थकबाकी वसूल               झालेली रक्कम
सातपूर                             104 कोटी 47 लाख                    16 कोटी 40 लाख 8 हजार
नाशिक पश्चिम                119 कोटी 84 लाख                    22 कोटी 64 लाख 78 हजार
नाशिक पूर्व                      182 कोटी 11 लाख                     21 कोटी 95 लाख 50 हजार
पंचवटी                            261 कोटी 75 लाख                     17 कोटी 57 लाख
नवीन नाशिक                 156 कोटी 16 लाख                      29 कोटी 84 लाख
नाशिकरोड                      166 कोटी 42 लाख                     21 कोटी 36 लाख
एकूण                              990 कोटी 78 लाख                    138 कोटी 25 लाख

यंदा अभय योजना दिली जाणार नसून, मिळकतदारांनी त्यांच्याकडील थकबाकी भरून महापालिकेला सहकार्य करावे. अन्यथा कर न भरणार्‍यांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल.
– नितीन पवार, उपायुक्त, मनपा

 

Mountain of arrears exceeds ₹900 crore.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

बापमाणूस

- ज्योती काळे-जाधव जगाने आईच्या मातृत्वाइतकाच पित्याच्या बिनशर्त त्यागाला महत्त्व दिले आहे का? बाप म्हणजे…

19 hours ago

का आकर्षिते ही जिंदगी?

- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…

19 hours ago

श्रावणी शुक्रवार

- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…

19 hours ago

अभ्यासाची आवड आणि करिअरची दिशा

महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…

19 hours ago

जेन-झी मानसिकता

बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्‍या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…

19 hours ago

मान्यता नाही, तरीही वर्ग सुरूच!

वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…

20 hours ago