मृत सहाशे दलघफू पाणी उचलता येणार; दहा कोटींचा खर्च
नाशिक : प्रतिनिधी
शहरात पाणीबाणी परिस्थिती उद्भवल्यास अशावेळी गंगापूर धरणातील मृत जलसाठ्याचा वापर करून या परिस्थितीवर काही प्रमाणात मात केली जाऊ शकते. त्यानुसार नाशिक महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने चर खोदण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी दहा कोटी खर्च केले जाणार आहे. पुढील महिन्यापासून चर खोदण्यास सुरुवात केली जाऊ शकते. त्यासाठीचे टेंडर प्रसिद्ध
केले आहे.
गंगापूर धरणातील जॅकवेलद्वारे पाणी उचलून थेट पाणीपुरवठा जलवाहिनीद्वारे बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्रावर पाणी नेले जाते. मात्र, धरणाची पाणीपातळी विशिष्ट मर्यादेच्या खाली गेल्यानंतर या ठिकाणी मोठा खडक लागतो. या खडकामुळे जॅकवेलपर्यंत पाणी पोहोचत नाही. खडकाच्या अडथळ्यामुळे धरणातील मृतसाठा असलेले 600 दलघफू पाणी वापरणे शक्य होत नाही. यावर उपाय म्हणून चर खोदून हा साठा वापरता यावा यासाठी पाणीपुरवठा विभागाने याआधी दोनदा सर्वेक्षण केले. ऐनवेळी पावसामुळे पाणीटंचाईचे संकट दूर होत असल्याने चर खोदण्याकडे दुर्लक्ष केले जात होते. मात्र, आता गंगापूर धरणातील सहाशे दलघफू मृत जलसाठा वापरण्यासाठी महापालिका पाणीपुरवठा विभागातर्फे धरणात चर खोदण्यात येणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे हा खडक फोडून जॅकवेलद्वारे मृत साठ्याचे पाणी उचलले जाणार आहे. दोन वर्षांपूर्वी पावसाचे उशिरा आगमन झाल्याने धरणाने तळ गाठला होता. अशा परिस्थितीत मृतसाठा उचलणे हा एकमेव पर्याय होता. परंतु, येथील खडकाच्या अडथळ्यामुळे पाणी उचलणार्या जॅकवेलपर्यंत पाणी पोहोचत नाही. आणीबाणीच्या परिस्थितीत हा पाणीसाठा नाशिककरांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. दरम्यान, खडकाचा अडथळा दूर केल्याशिवाय तो वापरता येणे शक्य नाही.
दोन वर्षांपूर्वी गंगापूर धरणात चर खोदण्यासाठी अंदाजपत्रकात बारा कोटींची तरतूद केली आहे. धरणातील मृत जलसाठ्याचा वापर करता यावा याकरिता चराचे काम हाती घेतले जाणार आहे. – रवींद्र धारणकर, अधीक्षक अभियंता, मनपा
Path cleared for digging a trench in Gangapur Dam.
- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…
- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…
महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…
बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…
वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…