अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ वाजे यांची संयुक्त राष्ट्रांच्या 81 व्या आमसभेच्या कामकाजासाठी भारताचे प्रतिनिधित्व करणार्या 12 सदस्यीय संसदीय प्रतिनिधी मंडळात निवड झाली आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातून या प्रतिनिधी मंडळात सहभागी होणारे ते एकमेव खासदार आहेत. या आमसभेत खा. वाजेंचा बुलंद आवाज
घुमणार आहे.
दि. 5 ते 9 ऑक्टोबर या कालावधीत न्यू यॉर्क येथे संयुक्त राष्ट्रांच्या 81 व्या अधिवेशनाच्या विविध समित्या व संबंधित कामकाजात ते सहभागी होणार आहेत. संयुक्त राष्ट्रांची आमसभा ही जगातील 193 सदस्य राष्ट्रांना एकत्र आणणारे प्रमुख बहुपक्षीय व्यासपीठ आहे. जागतिक शांतता व सुरक्षा, आर्थिक व सामाजिक विकास, मानवाधिकार, आंतरराष्ट्रीय कायदा, दहशतवाद, शाश्वत विकास यांसह विविध जागतिक प्रश्नांवर येथे चर्चा आणि धोरणात्मक विचारविनिमय होतो. खा. वाजे यांच्या या निवडीला त्यांच्या संसदीय कामकाजातील सक्रिय सहभागाची दखल म्हणून पाहिले जात आहे. 18 व्या लोकसभेत त्यांनी नाशिकच्या स्थानिक प्रश्नांपासून ते शेतकरी, कांदा उत्पादक, रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि विकासाशी संबंधित विविध विषय सातत्याने संसदेत मांडले आहेत. संसदीय कामकाजाच्या उपलब्ध नोंदीनुसार, त्यांनी आतापर्यंत शंभराहून अधिक प्रश्न उपस्थित केले आहेत. 36 चर्चांमध्ये सहभाग नोंदविला आहे. कांदा उत्पादकांच्या प्रश्नांपासून नाशिकमधील राष्ट्रीय महामार्ग, रेल्वेसेवा, आरोग्य सुविधा, शेतकर्यांचे प्रश्न आणि स्थानिक विकासाच्या विषयांपर्यंत त्यांनी सातत्याने संसदेत भूमिका मांडली आहे.
नाशिकपासून न्यू यॉर्कपर्यंतचा प्रवास
नाशिकच्या प्रश्नांसाठी संसदेत आवाज उठविणार्या लोकप्रतिनिधीची पावले आता संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक व्यासपीठावर पडणार आहेत. गोदावरीपासून कांद्यापर्यंत, शेतकर्यांपासून पायाभूत सुविधांपर्यंत आणि स्थानिक विकासापासून राष्ट्रीय प्रश्नांपर्यंत नाशिकच्या विविध प्रश्नांना संसदीय पटलावर मांडणार्या खा. वाजे यांच्या या आंतरराष्ट्रीय सहभागाकडे नाशिकचे प्रतिनिधित्व म्हणून पाहिले जात आहे. नाशिकचा आवाज आता केवळ दिल्लीच्या संसद भवनापुरता मर्यादित राहिलेला नाही; तो न्यू यॉर्कच्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठापर्यंत पोहोचत आहे.
संयुक्त राष्ट्रांची आमसभा ही जगातील 193 देशांना एका व्यासपीठावर आणणारे अत्यंत महत्त्वाचे जागतिक व्यासपीठ आहे. अशा ऐतिहासिक व्यासपीठावरील कामकाजासाठी भारताचे प्रतिनिधित्व करणार्या 12 सदस्यीय संसदीय प्रतिनिधी मंडळात माझी निवड होणे, हा माझ्यासाठी मोठा सन्मान आणि तितकीच मोठी जबाबदारी आहे. माझ्या संसदीय कामाची दखल घेत मला मिळालेली ही संधी नाशिककरांच्या विश्वासाला समर्पित आहे. भारताचा लोकप्रतिनिधी म्हणून या जागतिक व्यासपीठावरील विचारमंथन, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि विविध देशांच्या अनुभवांचा जवळून अभ्यास करून, त्याचा उपयोग नाशिक आणि देशाच्या विकासासाठी करण्याचा माझा प्रयत्न असेल.
– राजाभाऊ वाजे, खासदार, नाशिक
असे या सहभागाचे स्वरूप
बारा खासदारांचे बहुपक्षीय प्रतिनिधित्व
या प्रतिनिधी मंडळात देशाच्या विविध भागांतील, तसेच विविध राजकीय पक्षांचे लोकसभा सदस्य सहभागी आहेत. राजस्थान, त्रिपुरा, कर्नाटक, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, दिल्ली आदी राज्यांचे प्रतिनिधित्व या समूहात आहेत. या विविधतेत महाराष्ट्राचा आणि विशेषतः नाशिकचा प्रतिनिधी म्हणून राजाभाऊ वाजे यांचा समावेश ही नाशिकसाठी विशेष अभिमानाची बाब ठरली आहे.
MP Waje’s voice to resonate at the UN General Assembly.
पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…
तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…
ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…
महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…
विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…
(भाग 3) मागील ऐंशी वर्षांचा इतिहास बघितला तर जाणवेल की, बहुतांश काळ एका विशिष्ट पक्षाचे…