नाशिक

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले जात आहे. यातून मागील पाच वर्षांचा डाटा अपडेट केला जाणार आहे. तसेच अग्निशमनच्या सर्व वाहनांना जीपीएस यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. शहरात कुठेही आगीची घटना घडल्यास जीपीएसच्या मदतीने अग्निशमन वाहनाची स्थिती समजणार आहे. यामुळे होणारी जीवितहानी
टाळता येईल.
राज्य शासनाच्या नगर परिषद प्रशासन संचालनालयाद्वारे 15 व्या वित्त आयोगांतर्गत राज्यातील अ, ब, क आणि ड वर्गातील सर्व महापालिकांच्या अग्निशमन सेवांचे बळकटीकरण आणि डिजिटायझेशन करण्यासाठी नवीन प्रणाली लागू करण्यात आली आहे. त्यानुसार या नवीन उपक्रमांतर्गत अग्निशमन केंद्र, अग्निशमन वाहने व उपकरणे, कर्मचारी, आगीच्या घटनांच्या नोंदी, तपासणी आणि आपत्कालीन प्रतिसाद या सर्व बाबींचे पद्धतशीरपणे व्यवस्थापन केले जाणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन विभागाच्या वाहनांना जीपीएस यंत्रणा बसविण्यामुळे वेळेची बचत होणार आहे. आणीबाणीच्या प्रसंगी प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो. योग्य वाहनाची निवड झाल्यामुळे घटनास्थळी पोहोचण्याचा वेळ कमी होईल. जीपीएस यंत्रणा लाइव्ह ट्रॅफिक अपडेट्स देत असल्यामुळे चालकाला ट्रॅफिक, रस्ते बंद असणे किंवा काम सुरू असलेले मार्ग टाळून सर्वांत वेगवान आणि सुरक्षित मार्गाने घटनास्थळी पोहोचता येईल. नियंत्रण कक्षाला सर्व वाहनांचे लाइव्ह लोकेशन एकाच स्क्रीनवर दिसण्यास मदत होणार आहे. वाहनांच्या प्रत्येक
फेरीची नोंद होणार असल्यामुळे गाड्यांचा गैरवापर किंवा अनावश्यक फेर्‍या कमी होतील. अग्निशमन वाहनांमध्ये जीपीएस उपकरणे बसवणे आणि सॉफ्टवेअरचे एकत्रीकरण व चाचणी यासाठी तांत्रिक व प्रशासकीय सहकार्य करण्याबाबत महापालिका आयुक्तांना कळविले आहे. ई-फायर सॉफ्टवेअरमुळे अग्निशमन दलाच्या प्रक्रियांमध्ये एकसूत्रता येणार असून, यात एनओसी, नूतनीकरण आणि इतर मॉड्यूल्सच्या प्रशिक्षणासाठी सर्व मुख्य अग्निशमन अधिकार्‍यांना ऑनलाइन प्रशिक्षणात सहभागी होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रकल्प समन्वयासाठी महापालिकेने एका वरिष्ठ नोडल अधिकार्‍याची नियुक्ती करावी, असे संचालनालयाचे सहआयुक्त संजय काकडे यांनी पत्रकात म्हटले आहे. या पत्रकाच्या अनुषंगाने नाशिक मनपाच्या अग्निशमन विभागातील सर्वच सेवांचे डिजिटायझेशन करण्याचे काम सुरू झाले आहे.

अग्निशमनच्या वाहनांना जीपीएस यंत्रणा बसविल्यास शहरातील आपत्कालीन व्यवस्थापन अधिक वेगवान आणि तंत्रज्ञानस्नेही होण्यास मदत होईल. नुकत्याच झालेल्या बैठकीत डिजिटायझेशनविषयी सविस्तर माहिती मिळाली असून, या सेवेद्वारे मागील पाच वर्षांची सर्व माहिती अपलोड केली जाणार आहे.
– संजय बैरागी, अग्निशमन विभागप्रमुख, मनपा

GPS system for firefighting vehicles

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

1 hour ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

1 hour ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

1 hour ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

2 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

2 hours ago

लोकशाही आहे का?

(भाग 3) मागील ऐंशी वर्षांचा इतिहास बघितला तर जाणवेल की, बहुतांश काळ एका विशिष्ट पक्षाचे…

2 hours ago