– अशोक थोरात
’नायक’मधील एक दिवसाचा मुख्यमंत्री अनिल कपूर 24 तासांत सर्व बदलतो व अखेरच्या मिनिटात भामट्या सत्ताधार्यांना जेलमध्ये टाकतो, तसेच सध्या राज्यात गरजेचे आहे. ना. नरहरी झिरवळ विनोदी नेतृत्व, पण खात्यात काम नाही. कारवाईचे नाटक करणे एवढेच काम अन्न व औषध प्रशासन करीत होते. देवाभाऊंनी चांगले प्रामाणिक काम करतात म्हणून सर्वच राजकारण्यांचे शत्रू, पण जनतेचे आवडते अधिकारी तुकाराम मुंढे यांना या खात्याचे आयुक्त केले. 21 वर्षांच्या नोकरीत ही पंचविसावी बदली झाली. म्हणजे तुकाराम मुंढे राज्यातील सर्वांत वाईट अधिकारी. सरासरी वर्ष पूर्ण व्हायच्या आत बदली. अन्न व औषध प्रशासन हे सर्वांत महत्त्वाचे खाते, ज्याचा संबंध जनतेच्या आरोग्याशी आहे तेच खाते अडगळीत टाकले होते. हजर झाल्यापासून हे खाते कोमातून शुद्धीवर आले व धाडसत्र सुरू झाले.
राज्यात पशुधनाचा तपास नाही, पण भेसळखोरांचे दूध मात्र सुरूच असते. म्हणजे दुधाचा समुद्रच बनवला आहे भेसळीने. आता ग्रामीण भागात खरंच गुटखा येतच नाही, तर भेसळबहाद्दरांनी बरेच पदार्थ विकणे बंद केलेले आहे. पण याचे प्रमाण कमी आहे. भामटेगिरी थाबंलेली नाही, हे नक्की. खरे बोलायचे तर कानाकोपर्यांत मोठंमोठे भव्य मिठाईचे दुकान सर्वत्र दिसतात. चमकदार पॅकिंग, आकर्षक रंग, अशा मिठाया या दुधाच्या अजिबात नसतात. भेसळीचे बनवलेले दूध असते. म्हणून सर्वच भामट्यांनी मुंढे नावाचा धसका घेतला आहे.
बरेच लोक हॉटेलमध्ये जेवायची वेळ आलीच तर अंडा-करी, शेवभाजी, काजू मसाला व दाळ तडका खातात. कारण यात भेसळ बरीच कमी असते, असा समज आहे. वेगवेगळे चायनीज पदार्थ मात्र बनावट पनीरचे असतात. वेगवेगळे केमिकलचे रंग टाकून चव आणली जाते. तुकाराम मुंढेंची जर दुधातील भेसळबहाद्दर लॉबीने बदली केली तर राज्यात मोठा गोंधळ व आंदोलन उभे राहील. देवाभाऊ राहू द्या मुंढे साहेबांना. तीन वर्षांत निरोगी राज्य बघायला मिळेल, हे नक्की! जनतेच्या आरोग्याशी खेळणारे वैद्यकीय क्षेत्रात अनेक घटक आहेत. नामांकित व बनावट औषध कंपन्या सर्वत्र छुपा कारभार करीत असतात. सुमार दर्जाची औषधे बनावट लेबलने विकली जातात, ही वस्तुस्थिती आहेच. पनीरप्रमाणेच गूळ उत्पादकांनी मुंढेंच्या धाकाने गुळाचे उत्पादन बंद केल्याने गूळ मार्केट बंद पडले आहे. खरेतर यावर भागणार नाही. राज्यातील सर्वच क्षेत्रांत शुद्धीकरणाची गरज आहे.
Mundhesaheb, there is still a lot to do!
पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…
तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…
ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…
अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…
महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…
विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…