नाशिक

तपोवनात सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह

पोलिसांकडून हत्येच्या दिशेने तपास

पंचवटी/सिडको : प्रतिनिधी
पंचवटीतील तपोवन-अमरधाम रोड परिसरात गोदावरी नदीकाठच्या निर्जन भागात एका सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने ही घटना काही दिवसांपूर्वी घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
तपोवनातील कृषी गोशाळेसमोरील नदीकाठच्या रस्त्यालगत संरक्षक कठड्यांच्या पलीकडे एक सुटकेस पडलेली असल्याचे वॉटरग्रेस कंपनीच्या सफाई कर्मचार्‍यांच्या निदर्शनास आले. सुटकेसमधून तीव्र दुर्गंधी येत असल्याने त्यांनी तत्काळ आडगाव पोलिसांशी संपर्क साधला. या घटनेची माहिती मिळताच आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. सुटकेस उघडून पाहणी केली असता त्यामध्ये अंदाजे 30 ते 35 वर्षे वयोगटातील महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. त्यानंतर वरिष्ठ अधिकार्‍यांना घटनेची माहिती देण्यात आली.
पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, गुन्हे शाखेचे अधिकारी तसेच आडगाव आणि भद्रकाली पोलीस ठाण्यांच्या तपास पथकांनी घटनास्थळी भेट देत तपासाची सूत्रे हाती घेतली. फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि श्वान पथकाच्या मदतीने घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. श्वानाने पंचवटी कॉलेज परिसरातून द्वारकाकडे जाणार्‍या मार्गाच्या दिशेने संशयितांचा माग दर्शविल्याची माहिती समोर आली आहे.
मृत महिलेच्या हातावर त्रिशूल आणि ‘ॐ’ची गोंदणे आढळून आली आहेत. त्याच्या आधारे तसेच विविध पोलीस ठाण्यांतील बेपत्ता व्यक्तींच्या नोंदी तपासून ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय, परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे फुटेजही तपासले जात असून, या प्रकरणातील संशयितांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
दरम्यान, मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला असून, वैद्यकीय अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांकडून घटनेबाबत तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.

सुमारे तीन ते चार दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा

प्राथमिक तपासानुसार महिलेचा मृत्यू सुमारे तीन ते चार दिवसांपूर्वी झाला असावा. पोलिसांच्या मते, महिलेची हत्या अन्यत्र करून मृतदेह काही काळ लपवून ठेवण्यात आला असावा. त्यानंतर संशयितांनी पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह सुटकेसमध्ये भरून रात्रीच्या वेळी या सुनसान ठिकाणी आणून टाकला असावा.

 

Woman’s body found in a suitcase in Tapovan.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

2 days ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

2 days ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

2 days ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

2 days ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

2 days ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

2 days ago