सेवेकर्यांचा प्रखर विरोध; गोदाकाठावर कुंभमेळ्याची विकासकामे सुरू
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक पुण्यक्षेत्री होणार्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने गोदाकाठावर विविध विकासकामे सुरू आहेत. याच अंतर्गत लक्ष्मण झुलाचे काम गोदाकाठी सुरू असून, यासाठी येथील अनेक बांधकामे पाडण्याचा निर्णय नाशिक महानगरपालिकेने घेतला आहे. याच निर्णयाअंतर्गत गोदाकाठी सुमारे 20 वर्षांपासून सुरू असलेले श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र पाडण्याची नोटीस आल्याने हजारो श्री स्वामी समर्थ महिला, पुरुष सेवेकर्यांमध्ये संतापाची लाट आली. मंगळवारी (दि. 6) सुमारे 900 सेवेकर्यांनी गोदाकाठच्या केंद्रात ठिय्या मांडून आध्यात्मिक सेवा रुजू करून नाशिक महानगरपालिकेच्या या निर्णयाचा निषेध अनोख्या पद्धतीने व्यक्त केला.
वीस वर्षांपूर्वी नाशिक महानगरपालिकेतील तेव्हाचे नगरसेवक, महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष व सदस्य आणि आयुक्त यांच्या परवानगीने व आवश्यक त्या ठरावानुसार गोदाकाठी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र सुरू झाले. या केंद्राच्या माध्यमातून बालसंस्कारासह वेगवेगळे उपक्रम व इतर धार्मिक कार्यक्रम नेहमीच सुरू असतात. सेवामार्गाच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या सुमारे गेल्या तीन वर्षांपासूनच्या स्वच्छता अभियानात या केंद्राची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. सेवेकर्यांच्या वतीने होणारे दरवर्षीचे गंगापूजन आणि इतर कार्यक्रम या गोदाकाठच्या केंद्राच्या माध्यमातूनच होत असतात.
म्हणून सेवेकर्यांची या केंद्राशी भावनिक, आध्यात्मिक नाळ जुळली असून, रोज येथे आरतीसाठी सुमारे दोन-तीनशे सेवेकरी उपस्थित असतात आणि स्वच्छता अभियानाच्या प्रसंगी येथील हजारो सेवेकरी या उपक्रमात सहभागी होत असतात. हे केंद्र वाचविण्यासाठी शेकडो सेवेकर्यांच्या वतीने पुढाकार घेणारे येथील ज्येष्ठ सेवेकरी योगेश शिरापुरे म्हणाले की, कुंभमेळा प्रशासनाने याबाबतीत सहानुभूतीने विचार करून हे केंद्र आहे तसे ठेवून लक्ष्मण झुलाचे काम करावे यासाठी आमच्याकडून कोणतीच अडचण नाही.
Municipal Corporation’s decision to demolish the Shri Swami Samarth Kendra for the Lakshman Jhula project.
- अफजल पठाण चेहरे तो बहुत मिले जिंदगी की राहों में, कुछ अपने बनकर मिले,…
- प्रणाली देशमुख तू सुंदर आहेस पण ग्लॅमरस नाही, कदाचित म्हणूनच तू गुणाची खाण जरी…
- वासवदत्ता अग्निहोत्री ‘साथी हाथ बढ़ाना एक अकेला थक जाएगा मिलकर बोझ उठाना....’ हिंदी चित्रपटात…
- डॉ. किशोर पवार कपडे म्हणजे निर्जीव वस्तू, अशी आपली आजवरची संकल्पना होती. मात्र, चीनमधील…
लग्नाआधी मैत्रिणींच्या गप्पा असतात कुठे फिरायला जायचं? शॉपिंगला कधी भेटायचं? आज काय प्लॅन? आणि लग्नानंतर…